Ayesha Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आयशा खान, मुनव्वर फारुकीने मागितली एक्स गर्लफ्रेंडची माफी

Ayesha Khan: यावेळी अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांनी सर्वांसमोर इतर सदस्यांवर आरोप केले. पण यावेळी बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला घराबाहेर जावे लागले.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. बिग बॉस शोचा आता शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. या शोचा ग्रँड फिनाले येत्या 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत या प्रसारित होणार आहे. शोच्या शेवटच्या आठवड्यापूर्वी, बिग बॉसने घरात उपस्थित स्पर्धकांसाठी रोस्ट नाईटचे आयोजन केले होते. यामध्ये बाहेरचे प्रेक्षकही आले.

यावेळी अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांनी सर्वांसमोर इतर सदस्यांवर आरोप केले. पण यावेळी बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला घराबाहेर जावे लागले. लाइव्ह ऑडियन्सच्या वोटिंगच्या आधारे मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानला या आठड्यात घराबाहेर जावे लागले.

बिग बॉसने लाइव्ह ऑडियन्सला या आठवड्यासाठी नामांकित केलेल्या कोणत्याही स्पर्धकाला घराबाहेर काढून टाकण्याचा अधिकार दिला. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय, विकी जैन आणि आयेशा खान हे या आठवड्यासाठी एलिमिनेशनसाठी नामांकन केलेले स्पर्धक होते. लाइव्ह ऑडियन्सने एलिमिनेशनसाठी वोटिंग केले. यावेळी सर्वात कमी वोटिंग आयशा खानला मिळाले. त्यामुळे आयशा खानला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावे लागले.

Ayesha Khan Post

आयेशा घराबाहेर पडण्यापूर्वी मुनव्वरने तिची माफी मागितली. ज्याला त्याने टू-टाइमिंग म्हटले होते. आयरा खानच्या घराबाहेर जाण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा मन्नारा चोप्राने आयशाला मिठी मारली आणि हैदराबादमध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्यास सांगितले. शोमध्ये प्रवेश करताना आयशाने मुनव्वरवर काही गंभीर आरोप केले होते. तो तिला डबल डेट करत असल्याचा दावा तिने केला होता. मुनव्वर फारुकी पहिल्या दिवसापासून शोमध्ये होता. नंतर आयशा खानला वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश मिळाला. आयशाच्या एन्ट्रीने मुनव्वरची इमेज बदलली होती. मुनव्वर हा सह-स्पर्धक, पाहुणे आणि प्रेक्षकांचा आवडता असताना देखील आयेशाच्या एन्ट्रीने त्याची संपूर्ण ओळख उघड झाली आणि तो खूप उदास झाला होता.

'बिग बॉस 17' मधून बाहेर पडल्यानंतर, आयशा खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने तिचा बिग बॉस प्रवासाचा अनुभवही शेअर केला आहे. तिने इंस्टा स्टोरीवर लिहिले की, 'हा एक कठीण प्रवास होता आणि एक भावनिक वेळ. पण मला आनंद आहे की तुम्ही लोकांनी मला पाठिंबा दिला आणि मला प्रेम दिले.'

आयशा खानने पुढे लिहिले की, 'तुमच्याशिवाय हे शक्य झाले नसते. तुमच्या प्रेमाबद्दल नेहमीच कृतज्ञता आणि ऋणी राहिल.' आयशा खानने या पोस्टमध्ये एक शेर देखील शेअर केला आहे. तिने लिहिले की, 'जिंदगी सौंप दी है आपके हाथों में, बस आपका प्यार चाहिए!! और हां! पिक्चर अभी बाकी है! मेरे दोस्त ढेर सारा प्यार - आयशा खान.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT