Mannara Chopra Crying Video Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 मध्ये मन्नारा रडून रडून झाली बेहाल, नेमकं काय घडलं?

Bigg Boss 17 Latest News: सोशल मीडियावर आगामी एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे. या व्हायरल प्रोमोमध्ये मन्नारा रडताना दिसत आहे.

Chetan Bodke

Mannara Chopra Crying Video

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये नेहमीच वादग्रस्त म्हणून चर्चेत राहणाऱ्या ‘बिग बॉस १७’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. नेहमीच हा शो टीआरपी यादीमध्ये अव्वल ठरतो. प्रेक्षकांकडून या शोला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळत असून बिग बॉसच्या घरातले सर्वच सदस्य प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. भांडण, वाद, राडा आणि प्रेम असं चित्र सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत आहे. नुकताच सोशल मीडियावर आगामी एपिसोडचा प्रोमो व्हायरल होत आहे. या व्हायरल प्रोमोमध्ये मन्नारा रडताना दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या टीझरमध्ये, मन्नारा म्हणतेय, बिग बॉस, मला कन्फेशन रूममध्ये जायचं आहे. मला या शोमधून बाहेर पडायचं आहे. मन्नारा चोप्रा या प्रोमोमध्ये प्रचंड रडताना दिसून येत आहे. निर्मात्यांनी प्रोमो शेअर करताना कॅप्शन दिले की, ‘मन्नारा प्रचंड भावूक झालेली दिसते. तिला कोणी दुखावले?’ मन्नारा का रडतेय या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. मन्नाराचे अनेक स्पर्धकांसोबत वाद आपण झालेले पाहिले आहेत?, ती नेमकी कोणत्या कारणामुळे रडतेय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांची एन्ट्री होताच, एकमेकांमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यामुळे अनेक स्पर्धक सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले होते. त्यातीलच काही स्पर्धक म्हणजे मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) आणि मनारा चोप्रा (Mannara Chopra). शोच्या पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरामध्ये यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली, अशी चर्चा होत होती. मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा या दोघांची फ्रेंडशिप खूपच सध्या चर्चेत होत आहे. अनेकदा मन्नाराचे अंकिता सोबत वाद झालेले आपण पाहिले आहेत.

शोबद्दल सांगायचे तर, गेल्या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांवर रेशन टास्क होता. स्पर्धकांच्या कृत्यामुळे बिग बॉस सर्व स्पर्धकांवर नाराज आहे. जे टास्क खेळत असताना मध्ये मध्ये बोलत होते. त्यांच्यावर बिग बॉस नाराज आहे. टास्कदरम्यान बराच गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे बिग बॉसने तो टास्क मध्येच थांबवला. येत्या एपिसोडमध्ये आणखी काय पाहायला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT