TV Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

TV Actress : "मला एकटीला आत बोलावले अन्..."; चित्रपटासाठी प्रोड्युसरने अभिनेत्रीसमोर ठेवली घाणेरडी अट

Bigg Boss Fame TV Actress Casting Couch Experience : बिग बॉस फेम अभिनेत्रीने कास्टिंग काउचचा धक्कादायक प्रसंग सांगितला. चित्रपटासाठी प्रोड्युसरने तिच्यासमोर घाणेरडी अट ठेवली होती.

Shreya Maskar

टिव्ही आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे अंकिताला खूप लोकप्रियता मिळाली. आजवर तिने अनेक मालिका, चित्रपट आणि रिअलिटी शोमध्ये काम केले आहे. ती टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. मात्र करिअरच्या सुरुवातीला अभिनेत्रीला इंडस्ट्रीत संघर्षाचा सामना करावा लागला. अंकिता लोखंडे देखील कास्टिंग काउचची शिकार झाली आहे.

hauterrfly ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अंकिताने सांगितले की, "मी एका साऊथ चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. मला ती भूमिका मिळाली. मला खूप आनंद झाला. मी माझ्या आईला सांगितले की मी प्रोजेक्ट साइन करायला जात आहे... पण हे इतक्या सहजपणे कसे घडले याबद्दल माझ्या मनात शंकाही होती. जेव्हा मी चित्रपट साइन करायला गेले, तेव्हा फक्त मला एकटीलाच आत बोलावण्यात आले आणि माझ्या कोऑर्डिनेटरला थांबायला सांगितले. त्यांनी मला सांगण्यात आले, 'चित्रपटासाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावे लागेल...' तेव्हा मी फक्त 19 वर्षांचा होते."

मुलाखतीत अंकिताने पुढे सांगितले की, "तेव्हाच माझी हिरोईन बनायची इच्छा होती... मी हुशारी दाखवून पुन्हा विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, 'तुम्हाला प्रोड्युसरसोबत झोपावं लागेल...' मग मी त्याला म्हणाले की, 'मला नाही वाटत की तुमच्या प्रोड्युसरला कलेची गरज आहे... त्याला फक्त झोपायला एक मुलगी हवी आहे आणि मी ती नाही' असू म्हणून मी तिथून निघून गेले..."

'बिग बॉस १७' मध्ये अंकिता आपल्या पतीसोबत (विकी जैन) सहभागी झाली. तसेच अभिनेत्री कंगना रणौत यांच्या 'मणिकर्णिका' चित्रपटातही झळकली. 'लाफ्टर शेफ्स' च्या सीझनमध्येही अंकिता आणि विकी एकत्र दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : अडथळे दूर होतील, कामाच्या ठिकाणचा ताण वाढेल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

SCROLL FOR NEXT