Bigg Boss 17 Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: विकी जैन आणि नील भट्टमध्ये कडाक्याचे भांडण, एकमेकांच्या अंगावर गेले धावून; पाहा VIDEO

Vicky Jain And Neil Bhatt Fight: विकी जैन (Vicky Jain) आणि अभिनेता नील भट्ट (Neil Bhatt) यांचे कडाक्याचे भांडण झाले.

Priya More

Bigg Boss 17 New Promo Video:

'बिग बॉस'चा १७ वा (Bigg Boss 17) सीझन सुरू होऊन आता आठवडा पूर्ण होईल. या शोमध्ये एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. सलमान खानच्या या वादग्रस्त शोमधून दिवसेंदिवस प्रेक्षकांचे चांगले मनोरंजक होत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यापासूनच स्पर्धकांमध्ये भांडण होत असल्याचे आपण पाहत आहोत. पण आता हा वाद इतका वाढत चालला आहे की काही स्पर्धक मारण्यासाठी एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याचे दिसत आहे.

अशामध्ये नुकताच अभिनेत्री अंकिता लोखंडेचा (Ankita Lokhande) नवरा म्हणजेच बिझनेसमन विकी जैन (Vicky Jain) आणि अभिनेता नील भट्ट (Neil Bhatt) यांचे कडाक्याचे भांडण झाले. नीलचा पारा ऐवढा चढला की तो थेट विकीला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. याची झलक प्रोमो व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉस 17 च्या आगामी एपिसोडमध्ये घरामध्ये सर्वात जास्त शांत स्वभावाचा नील भट्ट देखील संतापलेला दिसणार आहे. अंकिता लोखंडेचा पती विकी जैन त्याच्या रागाचे कारण ठरला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिनेता विकी जैनसोबत नील भांडताना दिसत आहे. यावेळी नील इतका हायपर होतो की इतर जण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण नील ऐकायला तयार नसतो.

दरम्यान, विकी पुन्हा असे काहीतरी बोलतो ज्यामुळे नीलचा संयम सुटतो आणि तो विकीला मारण्यासाठी धावतो. आपल्या पतीला एवढा संतप्त झाल्याचे पाहून ऐश्वर्या शर्माने ही या भांडणात हस्तक्षेप केला आणि नीलला रोखण्याचा प्रयत्न केला.

नील भट्ट आणि त्याची पत्नी ऐश्वर्या शर्मा यांनी बिग बॉसच्या घरामध्ये एकत्र एन्ट्री केली. या शोमध्ये आल्यापासून हे कपल खूपच गोंधळलेले दिसत होते. ज्यानंतर बिग बॉसने त्याचा गोंधळ दूर केला आणि त्यांना गेममध्ये सक्रिय राहण्याचा सल्ला दिला. यानंतर बिग बॉसने नीलला घरात आपले लक्ष्य कोण असेल याबद्दल विचारले. त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने अंकिता आणि विकीची नावे घेतली होती.

आता नीलला राग कशाचा? याचा खुलासा प्रोमोमध्ये करण्यात आलेला नाही. पण या प्रोमोवरून आजचा एपिसोड खूपच धमाकेदार असणार हे दिसत आहे. नील आणि विकीचे भांडण कशावरून झाले याचे उत्तर तर तुम्हाला आजच्या एपिसोडमधून मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT