Rinku Dhawan Twitter @jiocinema
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Update: 'बिग बॉस 17'ची स्पर्धक रिंकू धवनचा लग्नानंतर 15 वर्षांनी झाला घटस्फोट, या सुप्रसिद्ध अभिनेत्याशी केले होते लग्न

Rinku Dhawan: अभिनेत्री रिंकू धवन स्टार प्लसवरील सुप्रसिद्ध मालिका 'कहानी घर घर की'मध्ये दिसली होती.

Pooja Dange

Who Is Rinku Dhawan:

'बिग बॉस 17' ची सुरुवात खूप धमाकेदार झाली आहे. यावेळी स्पर्धेत एकूण 17 स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. या स्पर्धकांमध्ये हिंदी टीव्ही विश्वातील कलाकारांचा देखील समावेश आहे. टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू धवन हे त्यापैकी एक नाव आहे.

अभिनेत्री रिंकू धवन स्टार प्लसवरील सुप्रसिद्ध मालिका 'कहानी घर घर की'मध्ये दिसली होती. अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. रिंकू धवनने अभिनेता किरण करमरकर यांच्याशी लग्न केले.

'कहानी घर घर की' या मालिकेत किरण करमरकर 'ओम अग्रवाल' या मुख्य भूमिकेत होते. तर अभिनेत्री रिंकू धवन ओमच्या बहिणीची 'छाया'ची भूमिका साकारत होत्या.

ऑनलाईन भावाबहिणीची ही जोडी या मालिकेदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडली. त्यांनी २००२ साली लग्न केले. परंतु लग्नाच्या १५ वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

रिंकू आणि किरण यांनी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा त्यांना एक मुलगा होता. त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याचा परिणाम मुलावर होऊ नये असे दोघांनीही वाटत होते.

रिंकू धवन आणि किरण करमरकर यांचा २०१९ साली घटस्फोट झाला. १ वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर दोघेही विभक्त झाले. त्याआधी २०१७ साली बाँबे टाइम्सने एका वृत्तात दोघेही वेगळे राहत असल्याचे म्हटले होते. परंतु तेव्हा दोन्ही कलाकारांना त्यांचे नात्यातील अडचणी सर्वांसमोर आणायचे नव्हत्या. (Bigg Boss 17)

बाँबे टाइम्सला दिलेल्या मुलखतीत किरण करमरकर यांनी त्यांच्या घटस्फोटाविषयी सांगितले. किरण म्हणाले की, 'आम्ही २००२ साली लग्न केले होते. आमच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत आणि यातील बेस्ट पार्ट म्हणजे आम्हाला एक मुलगा आहे. नातं मोडण्यासाठी कोणीच लग्न करत नाही.

नाती फक्त चित्रपट किंवा टीव्ही मालिकेत मोडतात असेही नाही. मला वाटत आमचं लग्न प्रोफेशनल डिमांड्समुळे मोडलं. आमच्या वैवाहिक जीवनात एक वेळ अशी आली की आमच्या आयुष्यात अनेक गोष्टींवर आमचं एकमत होत नव्हतं. मी आणि रिंकू एकमेकांसाठी योग्य जोडीदार नव्हतो. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.

Kiran Karmarkar With wife Rinku Dhawan

आम्हाला वाटलं देखील नव्हतं की आम्ही असा निर्णय घेऊ. परंतु भविष्य कोणीच सांगू शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली की आमच्या मुलाला आम्हाला यासाठी तयार करावे लागले. त्याला समजवावे लागले की आम्ही वेगळे होणार आहोत. पण यासगळ्यात आमचं एक ठरलं होत, आमच्यामुळे आमच्या मुलाला भोगावं लागणार नाही.

आजही तो आमच्या दोघांपैकी कोणाकडेही राहू शकतो. आम्ही त्याला सांगितलं आहे की आम्ही त्याच्या चांगल्या आणि वाईट काळात त्याला साथ देऊ. तो कुठे चुकत असेल तर त्याला त्याची चूक दाखवून सुद्धा देऊ.' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT