Ankita Lokhande And Vicky Jain Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नानंतर एकत्र का राहत नाहीत?, अभिनेत्रीनं सांगितलं खरं कारण

Ankita And Vicky Love Chemistry: बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केल्यापासूनच अंकिता आणि विकी यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहे. त्यांच्या नात्यामध्ये दूरावा आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Priya More

Ankita Lokhande And Vicky Jain:

प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. हे कपल 'बिग बॉस'च्या १७ व्या सीझनमध्ये (Bigg Boss 17) सहभागी झाले आहेत. सोशल मीडियावर नेहमीच रोमँटिंक क्षण शेअर करणाऱ्या अंकिता आणि विकी यांच्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केल्यापासूनच वाद होताना दिसत आहे. त्यांच्या नात्यामध्ये दूरावा आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

अशामध्ये अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या आयुष्याविषयी एक-एक खुलासे करताना दिसत आहे. नुकताच तिने सुशांत सिंह राजपुतसोबत झालेल्या ब्रेकअपविषयी सांगितले. त्यानंतर आता तिने लग्नानंतर विकी आणि ती एकत्र का राहत नाही यामागचे कारण सांगितले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, विकी आणि ती या शोमध्ये सहभागी झाली यामागचे कारण म्हणजे दोघेही एकत्र राहून एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकू. कारण शोच्या बाहेर दोघेही एकत्र राहत नाहीत. आता अंकिता आणि विकी एकत्र का राहत नाहीत यामागचे कारण तिने स्वत:च सांगितले आहे.

ई टाईम्सशी बोलताना अंकिता लोखंडेने सांगितले की, 'मी या शोमध्ये ४ महिन्यांची मोठी ट्रिप समजून आली आहे. ज्याठिकाणी आम्ही दोघे इन्जॉय करू शकू. आम्ही दोघं एकत्र राहत नाही. मी मुंबईमध्ये राहते. तर विकी बिलासपूरमध्ये राहतो. कारण त्याचा बिझनेस तिकडे आहे. तो मुंबईमध्ये येतो पण आम्हाला एकत्र २० दिवसांपेक्षा जास्त वेळ एकमेकांसोबत घालवता येत नाही. हनीमून सोडल्यानंतर हिच आमच्यासाठी एक चांगली संधी आहे.'

या मुलाखतीमध्ये अंकिताने सांगितले की, 'आमच्या दोघांमध्ये जेव्हा भांडण होते तेव्हा विकीला सर्वात आधी राग येतो. त्याला खूप लवकर राग येतो. पण त्याचा राग लवकर शांत देखील होतो.' बिग बॉसच्या घरामध्ये दोघं कशापद्धतीने गेम खेळणार याबद्दल अंकिताने सांगितले की, आमची ताकद मन, बुद्धी और शक्ती हेच आहे. आम्ही दोघेही खूपच फनी आणि मनोरंजक आहोत. आम्हाला कोणाचीही गरज लागत नाही. कारण आम्ही एकमेकांचे खूप मनोरंजन करतो. आम्ही दोघं एकमेकांना खूपच विचित्र नावाने बोलावतो आणि मस्ती करतो. आम्ही एकमेकांचा सहवास खूप इन्जॉय करतो. तेच तुम्हाला शोमध्ये दिसेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT