Abhishek Kumar Cried For Isha Malviya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'तुझ्याशिवाय या घरात मला कोणाचीही पर्वा नाही', ईशाच्या प्रेमात ढसाढसा रडला अभिषेक; VIDEO व्हायरल

Abhishek Kumar Cried For Isha Malviya: नुकताच या दोघांचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अभिषेक रडताना दिसत आहे.

Priya More

Bigg Boss 17 Promo:

टीव्हीचा लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) ला एक आठवडा पूर्ण झाला आहे. बिग बॉसच्या घरात १७ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केल्यापासून स्पर्धकांमध्ये वाद सुरू आहे. काही स्पर्धक एकमेकांच्या अंगावर देखील धावून गेलेत. पहिल्या विकेंड का वारमध्ये सलमान खानने या स्पर्धकांची चांगली शाळा देखील घेतली.

आता दुसऱ्या आठवड्यात देखील स्पर्धकांमध्ये भांडण होताना दिसत आहेत. अशामध्ये बिग बॉसच्या घरात एक्स कपल अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि ईशा मालवीय (Isha Malviya) यांचे देखील भांडण झाल्याचे दिसत आहे. नुकताच या दोघांचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अभिषेक रडताना दिसत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शोचा लेटेस्ट प्रोमो नुकताच रिलीज झाला. ज्यामध्ये अभिषेक आणि ईशामध्ये भांडण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अभिषेक ईशाला त्याच्या जवळ बसण्यास सांगत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे. पण ईशा उठून तिथून निघून जाते. यानंतर अभिषेक तिच्या मागे येतो आणि जोरजोरात तिला ओरडायला लागतो.

प्रोमोमध्ये अभिषेक ईशाला म्हणतो, 'तुझ्याशिवाय या घरात मला कोणाचीही पर्वा नाही. जर तू माझ्याशी वेगळं वागशील तर माझं डोकं खराब होईल.' तो ईशावर खूप जोरात ओरडतो. त्यानंतर ईशा त्याच्यापासून दूर जाते आणि कुठेतरी जाऊन बसते. ती कोणाशीच काहीही बोलत नाही. त्यानंतर अभिषेक त्याच्या बेडवर झोपून ढसाढसा रडतो.

ईशा आणि अभिषेक वर्षभरापूर्वीच वेगळे झाले आहेत. त्यानंतर दोघांनी बिग बॉस 17 च्या घरामध्ये एन्ट्री घेतली. घरात अनेकवेळा दोघांमध्ये वाद आणि प्रेमाचे क्षण पाहायला मिळतात. ईशाला अभिषेकपासून दूर राहायचे आहे. परंतु अभिषेक अजूनही तिचे प्रेम विसरू शकला नाही. आता ईशा नेमकं पुढे काय करते हे आता येत्या बिग बॉसच्या एपिसोडमध्येच दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात दुचाकी आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

Mumbai-Pune Missing Link: प्रवासाचा वेळ कमी होणार; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकची काय आहेत वैशिष्ट्ये?

रील की जीवाशी खेळ? वाढदिवसाला पेट्रोल ओतून रस्त्यावर लावली आग

Virar Tourism : मुंबईकरांनो 'विरार'मध्ये लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा, वीकेंडला घ्या घोडेस्वारीचा आनंद

Banana Bread Recipe: टी-टाइम स्नॅकसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि स्वादिष्ट मऊ बनाना ब्रेड, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT