Shiv Thakare And MC Stan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare: चर्चा शिवची ट्रॉफी MC स्टॅन घेऊन गेला, 'बिग बॉस १६'चा रनरअप कुठे कमी पडला?

शिव ठाकरेने यापूर्वी 'बिग बॉस मराठी २'ची ट्रॉफी जिंकली होती आणि आता 'बिग बॉस १६' चे विजेतेपदही जिंकणार अशी सर्वत्र चर्चा होती.

Chetan Bodke

Bigg Boss 16 Runner Up: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिॲलिटी शो 'बिग बॉस १६' च्या विजेत्याचे अखेर नाव जाहीर झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या वादग्रस्त शोचा MC स्टॅन विजेता ठरला आहे. तथापि, शिव ठाकरे या शोचे विजेता होणार, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. शिव ठाकरेने यापूर्वी 'बिग बॉस मराठी २'ची ट्रॉफी जिंकली होती आणि आता 'बिग बॉस १६' चे विजेतेपदही जिंकणार अशी सर्वत्र चर्चा होती. पण MC स्टॅनने ट्रॉफीवर आपले नाव झळकवले.

शिव ठाकरे 'बिग बॉस १६'मध्ये सुरुवातीपासूनच चर्चेत होता. शोमध्ये त्याने आणि त्यांच्या ग्रुपने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सर्वात आधी प्रियंका चहर चौधरी या शोची विजेती होणार अशी चर्चा होती, तर नंतर शिव ठाकरेच्या नावाची चर्चा होऊ लागली. पण रियलमध्ये सर्व खेळच पालटून गेला. MC स्टॅन शोचा विजयी झाला तर शिव ठाकरे उपविजेता ठरला. MC स्टॅनला मिळालेल्या जबरदस्त वोट्समुळे आणि त्याला चाहत्यांनी दिलेल्या भरघोस प्रेमामुळे त्याने ट्रॉफीवर नाव कमावले.

शिवला सर्वांचा इतका सपोर्ट मिळूनही तो विजेता होऊ शकला नाही. शिवला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सपोर्ट केला होता. शहनाज गिल, बिग बॉस ९ची विजेती प्रिन्स नरुला आणि रणविजयनेही शिवच्याच नावावर विनर म्हणून शिक्कामोर्तब केले होते. 'बिग बॉस १६'चा विजेता होण्यासाठी शिव ठाकरेने चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याचा कोणताच मुद्दा सोडत नव्हता. पण तरीही तो ट्रॉफीपासून दूर राहिला.

शिव ठाकरे नेहमी आपल्या साधेपणामुळे आणि खास शैलीमुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. आज शिव ठाकरे कोणत्याही अस्मितेवर अवलंबून नसला तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी शिवाला बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. जरीही शिवला विजेते पद नसेल मिळाले तरीही त्याने सर्व प्रेक्षकांच्या मनावर आपले नाव कोरुन गेला आहे. सोबतच शिवला चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने 'खतरों के खिलाडी'शो साठी ही विचारले होते. कदाचित येत्या सीझनमध्ये शिव दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

SCROLL FOR NEXT