Shalin Bhanot Saam TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16 Final: 'बिग बॉस'च्या घरातून शालिन भनोत बाहेर

सर्व स्पर्धकांना एका स्पर्धकाला टॉप ५ मधून बाहेर काढायचे होते.

Pooja Dange

Bigg Boss 16 Finale Update: 'बिग बॉस १६'चा आज ग्रँड फिनाले आहे. या पर्वाची सुरूवात अशी झाली तसाच शेवट देखील धमाकेदार होता आहे. ढोल-ताश्याच्या गजरात या ग्रँड फिनालेची सुरूवात झाली. सलमान खान, भरती आणि क्रिष्णा यांनी कॉमेडी करत ग्रँड फिनालेचा माहोल बनवला.

बिग बॉस 16'च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांनी जागा मिळवली. तसेच सर्व स्पर्धकांनाही देखील घरामध्ये एन्ट्री केली आहे. रॅप बॅटल, संगीत खुर्ची, एकमेकांविषयी चांगल्या आणि वाईट असे विविध गेम्स शेवटच्या दिवशी देखील खेळण्यात आले.

बिग बॉसने यावेळी सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का दिला. टॉप ५ स्पर्धकांच्या घरचे सुद्धा इतर स्पर्धकांसह कार्यक्रमात सहभागी झाले. तर टॉप ५ स्पर्धकांच्या आईंनी त्यांना दही-साखर भरवली आणि खेळाला सुरूवात झाली.

त्यानंतर सुरू झाला बिग बॉस फिनालेचा खरा खेळ. यात देखील बिग बॉसने ट्विस्ट टाकला. बिग बॉस स्पर्धकांना मिळून एक निर्णय घ्यायला सांगितला. सर्व स्पर्धकांना एका स्पर्धकाला टॉप ५ मधून बाहेर काढायचे होते. जर स्पर्धकांचे आणि प्रेक्षकांचे मत एक झाले तर त्यांना त्याच्या प्राईज मनीमध्ये १० लाख वाढणार असल्याचे बिग बॉसने सांगितले.

टॉप ५ स्पर्धकांची यावर खुप चर्चा झाली. उर्वरित चार स्पर्धकांनी शालिन भनोतचे नाव घेतले. तर प्रेक्षकांचा कौल देखील शालिनच्या बाजूने लागला. त्यामुळे बिग बॉसमधून शालिन भनोत घराबाहेर गेला.

आता 'बिग बॉस १६' ट्रॉफीचे दावेदार आहेत शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि प्रियांका चहर चौधरी. आता या स्पर्धकांमधून कोण या ट्रॉफीवर आपले नाव कोरणार हे काही वेळातच कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? उमेदवारीच्या निर्णयावर आक्षेप घेत सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT