Shiv Thakare And Akanksha Puri Relation Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shiv Thakare Girlfriend: शिव ठाकरेला ड्रीम गर्ल मिळाली; आता वीणा नाही तर... 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट?

शिव ठाकरे पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे.

Chetan Bodke

Shiv Thakare And Akanksha Puri Relation: टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा शो म्हणजे ‘बिग बॉस १६’. ‘बिग बॉस १६’ हा शो संपून अनेक दिवस झाले असून या शो मधील अनेक स्पर्धक आजही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस १६’ चा पहिला उपविजेता शिव ठाकरे नेहमीच आपल्या आगामी प्रोजेक्ट्समुळे बराच चर्चेत असतो. अशातच तो आता यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

शिव ठाकरे ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना त्याची आणि वीणा जगतापची जोडी देखील चांगलीच जमली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर देखील त्यांच्या रिलेशनची बरीच चर्चा रंगली होती. नुकतंच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली. ‘बिग बॉस १६’मध्ये असताना देखील शिवचे चाहते त्याला वीणाच्या नावाने चिडवायचे पण, अनेकदा त्याने तो सिंगल असल्याचे सांगितले. आता पुन्हा एकदा तो त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. (Bollywood Actor)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरे पुन्हा प्रेमात पडला आहे. त्याला त्याची ड्रिम गर्ल मिळाली असून तो एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीला डेट करत असल्याचे सांगितलं जात आहे. ‘बिग बॉस १६’मध्ये असताना शिवने अनेकदा तो सिंगल असल्याचे देखील सांगितले. सध्या, शिव ठाकरे टेलिव्हिजन अभिनेत्री आकांक्षा पुरीला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहे. दोघंही अनेकदा बऱ्याच कार्यक्रमात दोघंही एकत्र स्पॉट झाले आहेत, त्यानंतर डेटिंगच्या अफवा वार्‍यासारख्या पसरल्या आहे. (Entertainment News)

नुकतेच त्याने डेटिंगच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत, तो म्हणतो, “माझ्या रिलेशनच्या बातम्या बिनबूडाच्या आहेत. त्यांना कोणताही तथ्य नाही.”

तर आकांक्षा पुरी शिवविषयी म्हणतात, “आमच्या दोघांच्याही रिलेशनच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, शिव बिग बॉसच्या घरात खूप चांगला खेळतो. तो एक सुंदर आणि चांगला माणूस आहे, पण दुर्दैवाने माझ्या नशिबात चांगली मुलं नाहीत.”

तिची ही प्रतिक्रिया पाहून सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तिने शिवला रिलेशनच्या बाबतीत काही हिंट दिला आहे का असा सवाल सर्व विचारत आहेत. तर दुसरीकडे तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला टोमणा मारला आहे का असंही काहीजण म्हणत आहे. ‘बिग बॉस १३’ चा स्पर्धक पारस छाब्रा आणि आकांक्षा पुरी हे दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण कालांतराने पारससोबतचे तिचे नाते अतिशय वाईट वळणावर संपले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

SCROLL FOR NEXT