Salman Khan Hosting Bigg Boss 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: सलमान नाही तर 'हा' अभिनेता होस्ट करणार 'बिग बॉस १६'

येत्या पुढच्या आठवड्यापासून बिग बॉसच्या १६ पर्वामध्ये होस्ट म्हणून सलमान खान दिसणार नसून आता नवा कलाकार होस्टच्या रुपात दिसणार आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 16: टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस १६' सध्या . गेल्या अनेक वर्षांपासून या शोची होस्टिंग सलमान खान करत होता, त्याच्यामुळे या कार्यक्रमालाही बराच टीआरपी मिळत होता. प्रत्येक सीझनमध्ये तो त्याच्या होस्टिंग शैलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नुकत्याच एका मिळालेल्या माहितीनुसार, आता दबंग खान या सीझनमध्ये होस्टिंग करणार नसून तो थेट फिनाले एपिसोडमध्येच दिसणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आता वीकेंड का वॉरमध्येही दिसणार नाही. त्याच वेळी, आता थेट सलमान खान थेट फिनाले एपिसोडमध्येच दिसणार असून त्याच्या जागी बॉलिवूड निर्माता करण जोहर दिसणार आहे.

म्हणजेच 'बिग बॉस ओटीटी'चा होस्ट करण जोहर पुन्हा होस्टिंग करताना दिसणार आहे. यापूर्वी एकदा सलमान खानची तब्येत बिघडली होती, तेव्हा करण जोहर बिग बॉसच्या घरातील सदस्यांना क्लासेस देताना दिसला होता. मात्र, काही एपिसोड्सनंतर सलमान खान पुन्हा एकदा शोमध्ये परतला.

गेल्या काही दिवसांपूर्वी सलमानचे बिग बॉसच्या कार्यक्रमातील करार संपला होता, अशी बातमी बरीच व्हायरल होत होती. अखेर आता सलमानचे 'बिग बॉस 16' सोबतचा करार संपला आहे. अशा परिस्थितीत हा विकेंड सलमान खानचा शेवटचा विकेंड ठरू शकतो. आता तो थेट अंतिम फेरीत येऊन विजेत्याच्या नावाचीच घोषणा करणार आहे, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्सकडून मिळालेली आहे.

गेल्या आठवड्यात 'बिग बॉस 16' च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणारी श्रीजीता डे घर सोडून गेली आहे. याशिवाय अब्दू रोजिकनेही त्याच्या काही प्रोजेक्ट्समुळे शो मध्येच सोडला आहे. शोमधील दिवसांमध्ये आणखी वाढ झाल्यापासून अब्दू शोमधून बाहेर पडल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. अखेर अब्दूच्या जाण्याने सर्व स्पर्धकांची निराशा झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

SCROLL FOR NEXT