Bigg Boss 16 Latest Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'बिग बॉस १६'च्या घरात रंगणार 'खतरों के खिलाडी', कोणाला लागणार रोहितचा जॅकपॉट...

रोहितने नुकतीच 'बिग बॉस १६'च्या घरात मोठ्या धुमधडाक्यात एन्ट्री केली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 16 Latest Update: 'बिग बॉस १६'ची ट्रॉफी कोण जिंकणार या प्रश्नाचे उत्तर अखेर आपल्याला उद्या संध्याकाळी मिळणार आहे. यासाठी सध्या टॉप ५ स्पर्धक या शर्यतीत आहेत. शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, MC स्टॅन, शालिन भानोत आणि अर्चना गौतम या टॉप ५ स्पर्धकांमध्ये फायनलची चुरस रंगणार आहे. सोबतच यावेळी विकेंडमध्ये स्पर्धकांसह प्रेक्षकांना एक धक्का अनुभवायला मिळणार आहे. तो म्हणजे रोहितच्या एन्ट्रीचा. चॅनलने शेअर केलेल्या प्रोमोत चित्रपट निर्माता रोहित शेट्टी काही स्टंट करत त्याने घरात एन्ट्री केली.

शुक्रवारी झालेल्या एपिसोडमध्ये प्रियांका आणि शालिन यांचा 'बिग बॉस १६'च्या घरातील रंजक प्रवास दाखवण्यात आला होता. पहिल्या दिवसापासून टॉप ५ स्पर्धकांमध्ये येण्यापर्यंतचा तिचा प्रवास एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता. चॅनलने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रोहितच्या धमाकेदार एन्ट्रीने सर्वच थक्क झाले. रोहितच्या जबरदस्त एन्ट्रीने विकेंडला घरात काय होणार हे आजच्या भागातच कळणार आहे.

'खतरों के खिलाडी'च्या आगामी सीझनसाठी नवीन स्पर्धक निवडण्यासाठी तो बिग बॉसच्या घरात आला. शनिवारच्या शोचे नुकतेच चित्रीकरण करण्यात आले असूव शोच्या इतिहासात पहिल्यांदाच 'खतरों के खिलाडी'चा होस्ट थेट 'बिग बॉस'मधून स्पर्धक निवडणार आहे. 'खतरों के खिलाडी'च्या पुढच्या सीझनची रोहित शेट्टी घोषणा करत पहिला स्पर्धक निवडणार आहे. तो फिनालेमध्ये नावाची घोषणा करणार असल्याचं समजत आहे.

'खतरों के खिलाडी'च्या पुढच्या सीझनसाठी शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांची जोरदार चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहितने 'खतरों के खिलाडी'च्या आगामी सीझनमध्ये स्पर्धक म्हणून शिव ठाकरेची निवड केली आहे.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा रोहित 'बिग बॉस १६'मध्ये 'सर्कस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता, तेव्हा त्याने शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी आणि अब्दू रोझिक यांना हा शो ऑफर केला होता.

आज रात्रीच्या एपिसोडमध्ये, शिव ठाकरे, MC स्टेन आणि अर्चना गौतम यांच्या 'बिग बॉस १६'च्या घरातील प्रवास अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT