Bigg Boss 16 Finale Instagram/ @colorstv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16 Latest Update: टॉप ५ स्पर्धक, एक ट्रॉफी, मोठ्या थाटामाटात संपन्न होणार 'बिग बॉस १६'चा ग्रँड फिनाले...

'बिग बॉस १६' चा महाअंतिम सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल, याची आपण माहिती घेणार आहोत.

Chetan Bodke

Bigg Boss 16 Latest Update: गेल्या अनेक दिवसांपासून टेलिव्हिजनवरील अनेक शो बरेच चर्चेत आहेत. त्यातीलच एक शो म्हणजे 'बिग बॉस १६'. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांकडून नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.त्या प्रमाणे देखील यासुद्धा सीझन त्याहून अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. अखेर उद्या हा शो प्रेक्षकांची रजा घेणार आहे. येत्या रविवारी 'बिग बॉस १६'चा मोठ्या थाटामाटात ग्रँड फिनाले शो पार पडणार आहे. 'बिग बॉस १६' चा महाअंतिम सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल, याची आपण माहिती घेणार आहोत.

सध्या बिग बॉस हिंदीच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयारीही सुरु असल्याचे दिसत आहे. कोणता स्पर्धक ही ट्रॉफी नेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अनेकदा तर्क- वितर्क ही लावण्यात आले होते. अखेर तो क्षण अवघ्या दिवसांवरच येऊन ठेपला आहे.

रविवारी अर्थात १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कलर्स या हिंदी वाहिनीवर प्रेक्षकांना 'बिग बॉस १६'चा ग्रँड फिनाले रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

नेहमीप्रमाणे या ही ग्रँड फिनालेचे होस्टिंग बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करणार आहे. कलर्स सोबतचा करार संपल्याने सलमान गेले अनेक दिवस होस्ट म्हणून दिसत नव्हता. पण तो आता प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रेमामुळे ग्रँड फिनालेला होस्ट म्हणून दिसणार आहे.

बिग बॉस हिंदीच्या महाअंतिम सोहळ्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूपच उत्सुकता दिसुन येत आहे. अनेक चाहते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना मत देताना दिसत आहेत. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अखेर 'बिग बॉस १६'ची ट्रॉफी कोण घरी नेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

'बिग बॉस १६'च्या महाअंतिम सोहळ्यात आपल्या आवडत्या कलाकाराने बाजी मारावी असं सर्वांनाच वाटत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकाराला मत द्या अशा आशयाच्या पोस्ट देखील बऱ्याच व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या महाअंतिम फेरीत शिव ठाकरे, MC स्टेन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत यांच्यात 'काटे की टक्कर' होणार आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठीचा सोळावा सीझन कोण जिंकणार हे पाहणे? महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

SCROLL FOR NEXT