Bigg Boss Contestant Party Instagram/ @archanagautamm
मनोरंजन बातम्या

'Bigg Boss 16'च्या मंडळींसाठी खास पार्टीचे आयोजन, 'या' जोडीचा व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

नुकतेच बिग बॉसच्या सर्व सदस्यांसाठी बॉलिवूड दिग्दर्शक फराह खानने पार्टीचे आयोजन केले होते.

Chetan Bodke

Bigg Boss Contestant Party: टेलिव्हिजनवरील नेहमीच वादग्रस्त आणि प्रेक्षकांच्या पसंदीस उतरणारा शो म्हणजे 'बिग बॉस '. 'बिग बॉस' नेहमीच टेलिव्हिजनवर टीआरपीच्या बाबतीत अव्वल आहे. नुकताच बिग बॉसच्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकतेच बिग बॉसच्या सर्व सदस्यांसाठी बॉलिवूड दिग्दर्शक फराह खानने पार्टीचे आयोजन केले होते.

यावेळी सदस्यांमध्ये तिचा भाऊ साजिद खान देखील होता. या पार्टीतील काही व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतमचा एक व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. यांच्यात नेहमीच बिग बॉसच्या घरात असताना भांडण व्हायचे. नेहमीच वाद घालणारी जोडी कशी काय एकत्र आली असा नेटकऱ्यांनी प्रश्न विचारला.

‘जवानी जाने मन’ या गाण्यावर शिव आणि अर्चना रोमँटिक गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. अर्चनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिवबरोबर डान्स करतानाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला बरेच ट्रोल केले आहे.

हा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात, “हिला पण शिवचं फुटेज पाहिजे. मंडलीमध्ये नसणारे सगळे शिवच्या पाठीमागे लागले आहेत” अशी कमेंट करत एका युजरने तिला ट्रोल केले. तर दुसऱ्याने “अर्चना आणि शिव फक्त डान्स करतानाच चांगले दिसतात” असं म्हटलं. अनेकांनी शिव ठाकरे व अर्चनाच्या डान्सचं कौतुक करत त्यांच्या केमिस्ट्रीला पसंदी दर्शवली. “तुम्ही दोघे एकत्र छान दिसता” अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे. शिव व अर्चनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अर्चना गौतम व शिव ठाकरे ‘बिग बॉस हिंदी १६’च्या टॉप ५ फायनलिस्टपैकी एक होते. रॅपर एसमी स्टॅनने सर्वाधिक मतं मिळवत विजेता होण्याचा मान मिळवला. तर शिव ठाकरे फर्स्ट रनर अप ठरला. अर्चनाला मात्र चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teachers Salary: दीड लाख शिक्षकांचा पगार थांबणार; सुप्रीम कोर्टानंतर शिक्षण विभागाकडूनही कोंडी?

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कोणत्या वस्तू खरेदी करू नये?

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT