Archana Gautam eliminated after hitting Shiv Thakare Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'बिग बॉस 16'च्या घरामधून अर्चना गौतम बाहेर, शिव आणि अर्चनाच्या भांडणामुळे निर्मात्यांचा निर्णय

अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात वादावादी झाली आणि 'बिग बॉस'ने तिला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss 16 Elimination: हिंदी 'बिग बॉस 16' हा प्रचंड वादग्रस्त शो आहे. 'बिग बॉस 16' मधून खूप चर्चेत असलेली स्पर्धक अर्चना गौतम हिला शोमधून बाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अर्चना गौतम पहिल्या दिवसापासूनच लोकप्रिय आहे. मात्र ती अचानक शोमधून बाहेर गेल्याचे समजताच तिच्या चाहत्यांना नक्कीच मोठा धक्का बसणार आहे.

अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात वादावादी झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादावादीत अर्चना गौतम फिजिकल झाली. 'बिग बॉस'ने मध्यस्थी करत अर्चनाला शिवासोबतचे सुरू असलेले भांडण थांबवण्यास सांगितले. पण अर्चना थांबली नाही. यानंतर 'बिग बॉस'ने तिला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. (Shiv Thakare)

या आठवड्यात तीन स्पर्धक घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये सुंबुल तौकीर खान, गोरी नागोरी आणि प्रियांका चहर चौधरी यांच्या समावेश आहे. आता अर्चनाला या आठवड्यात मधेच घरातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे निर्माते या आठवड्यात शोमधून इतर कोणाला बाहेर काढतात की अर्चना गेल्यानंतर या आठवड्यात नॉमिनेट झालेले स्पर्धक सुरक्षित होणार का हे पाहावे लागेल.

'बिग बॉस'च्या घरामध्ये याआधीही अनेक स्पर्धकांना त्यांच्या वागणुकीमुळे घरातून बाहेर काढण्यात आले आहे. १३व्या सीझनमध्ये, मधुरिमा तुलीला बिग बॉसने शोमधून बाहेर काढले होते. कारण तिने विशाल आर्यनवर कढई फेकली होती. सीझन 8 मध्ये आर्य बब्बरसोबत झालेल्या भांडणानंतर 'बिग बॉस'ने पुनीत इस्सरला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, नंतर तो पुन्हा शोमध्ये परतला होता. सातव्या सीझनमध्ये विशाल टंडनलाही शो मधून बाहेर जावे लागले होते. व्हीजे अँडीसोबत त्याचे भांडण झाले होते, परंतु नंतर तो शोमध्ये परतला होता. शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेलाही शोमधून बाहेर काढण्यात आले होते. त्याने रोहित वर्माला बाटली फेकून मारली होती, पण ती शमिता शेट्टीला लागली होती. त्यानंतर त्याला बाहेरचा रास्ता दाखविण्यात आला होता. (Bigg Boss)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CID मध्ये डेडबॉडीची भूमिका साकारण्यासाठी किती रुपये मिळायचे? बिग बॉस फेम अभिनेत्रीने केला खुलासा

Mumbai Monsoon Tourism: स्वित्झर्लंडलाही टक्कर देणारी मुंबईजवळची ही 4 ठिकाणं; पावसाळ्यात सौंदर्य होतं दुप्पट

Maharashtra News Live Update: नागपुरात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळा

Mega Block : विकेंडला घराबाहेर फिरायला जात असाल तर थांबा; 'या' मार्गावर रविवारी असणार मेगा ब्लॉक, वाचा वेळापत्रक

Cloud Formation : आकाशातील ढग नेमके तयार कसे होतात? जाणून घ्या या मागचं भन्नाट वैज्ञानिक कारण

SCROLL FOR NEXT