Baap First Look: अॅक्शन ड्रामा चित्रपट 'बाप'चा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात 80 आणि 90 च्या दशकातील सुपर स्टार - जैकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल एकत्र दिसत आहेत. निर्मात्यांनी नुकतेच एक पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये चारही अभिनेते गँगस्टरच्या रूपात दिसत आहेत. या चित्रपटचे चित्रीकरण सुरू झाले आहे. विवेक चौहान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
'बाप' चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये सर्वच कलाकारांचा लूक खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे. सनी देवलला पाहून असे वाटते की, तो या चित्रपटात कैद्याची भूमिका साकारणार आहे. इतकेच नाही तर केशरी रंगाचा ड्रेस, लांब केस आणि दाढी असलेल्या सनीला पाहून चाहत्यांना त्याचा 'जीत' चित्रपटाची आठवण येत आहे. तसेच मिथुन, जॅकी आणि संजय यांच्या लूक देखील फार वेगळा दिसत आहे. (Actors)
जॅकी श्रॉफ, सनी देवल आणि संजय दत्तने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या पोस्टरचे फोटो शेअर केला आहे, "शूट धमाल, दोस्ती बेमिसाल।" चित्रपटाच्या पोस्टर येण्यापूर्वी जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी जूनमध्ये एका फोटोद्वारे चित्रपटाच्या शूटिंगची माहिती दिली होती. मात्र, या फोटोत सनी देओल नव्हता. त्यानंतर सनीने गमतीने सांगितले की, तो लवकरच 'धाई किलो के हाथ' घेऊन या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी होणार आहे. (Movie)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.