MC Stan Big Boss 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

MC Stan: चांद्यापासून बांद्यापर्यंत रॅपरचीच हवा, चाहत्यांनी मुंबईच्या रस्त्यावर झळकवले स्टॅनचे बॅनर

एम.सी.स्टॅनचे असंख्य चाहते त्याचे रॅप गात मुंबईच्या रस्त्यावर उतरले.

Chetan Bodke

Bigg Boss 16: गेल्या अनेक दिवसांपासून 'बिग बॉस १६' या रिअॅलिटी शोची चर्चा सुरु आहे. सर्वाधिक टीआरपी असलेला कार्यक्रम लवकरच येत्या काही दिवसात प्रेक्षकांची रजा घेणार आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे. सध्या टॉप ५ स्पर्धक खेळाच्या शेवटापर्यंत पोहोचले आहेत. प्रत्येक स्पर्धकाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे, एम.सी.स्टॅन.

शोमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटीने एम.सी.स्टॅनचे कौतुक केले आहे. अगदी घराबाहेर पडलेल्या एम.सी.स्टॅनच्या विरोधकांनी बिग बॉसचा विजेता म्हणून त्याचेच नाव घेतले आहे. अनेक घराच्या बाहेर गेलेल्या स्पर्धकांनी त्याच्यासाठी ट्विट करत त्याच्या गेमप्लेसाठी रॅपरचे कौतुक केले आहे. अलीकडेच #TrophyAwaitsMcStan ने काही तासांत 1 दशलक्षाहून अधिक ट्वीट्स पार केले आहेत.

फायनलसाठी, एम.सी.स्टॅनच्या चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्टारसाठी काहीतरी विलक्षण केले. एम.सी.स्टॅनचे असंख्य चाहते त्याचे रॅप गात मुंबईच्या रस्त्यावर उतरले. तर काही त्याच्या एम.सी.स्टॅनच्या वाक्यांवरही एकमेकांमध्ये गप्पा मारताना दिसले. रॅपरसाठी त्याचे सर्वच चाहते मुंबईच्या रस्त्यावर जल्लोष करत होते, सोबतच तोच जिंकणार अशा घोषणाही दिल्या. इतकेच नाही तर त्यांनी पोस्टर आणि बॅनरसह एम.सी.स्टॅनच्या प्रवासाचे कौतुक केले.

असा पाठिंबा आणि असे प्रेम आजपर्यंत कोणत्याही स्पर्धकाला देण्यात आलेले नाही. एम.सी.स्टॅनचे खरे व्यक्तिमत्व, त्याचे शब्द आणि एका पुढाऱ्या सारखे वागणे यामुळेच तो बिग बॉसच्या घरात चर्चेत आला. सध्या 'बिग बॉस १६'च्या घरातील स्पर्धक शिव ठाकरे, निमृत कौर अहलुवालिया, सुंबुल तौकीर, साजिद खान आणि अब्दु रोझिक यासदस्यांचे एम.सी.स्टॅनसोबत घनिष्ट नाते आहे. 'बिग बॉस १६' फिनालेला फक्त काही दिवसच शिल्लक राहिले असून ग्रँड फिनालेला सलमान खानच या कार्यक्रमाचे होस्टिंग करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

Face Care: उन्हाळ्यातही तुमचा चेहरा करेल नॅचरल ग्लो; फक्त 'या' फळांचा तुमच्या आहारात करा समावेश

कल्याणमध्ये देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मारक होणार; वास्तूजवळ कोणकोणत्या सुविधा असणार?

UGC कडे तक्रार अन् आयुर्वेद कॉलेजमधील 18 विद्यार्थ्यांचं निलंबन; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra HSC Result: १२ वीचा निकाल 'Coming Soon'; रिझल्टबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT