Amitabh Bachchan Visits Ayodhya Ram Temple Twitter
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan In Ayodhya: अमिताभ बच्चन यांनी पुन्हा घेतलं रामलल्लाचं दर्शन; कारणही ठरलं खास

Amitabh Bachchan News: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रभु श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत. यावेळी एका खास कारणासाठी ते अयोध्येत गेले होते.

Chetan Bodke

Amitabh Bachchan Visits Ayodhya Ram Temple

अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी रामजन्मभूमीतच नाही तर अवघ्या देशभरामध्ये प्रभु श्री रामाच्या येण्याने आनंद व्यक्त करण्यात आला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले होते. अशातच बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रभु श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत गेले आहेत. यावेळी एका खास कारणासाठी ते अयोध्येत गेले होते.

बिग बी जरीही फारसे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसले तरीही रिॲलिटी शोच्या माध्यमातून किंवा जाहिरातींच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. बिग बी एका ज्वेलरी ब्रँडचे ब्रँड अँबेसिडर आहेत. त्याच ज्वेलरी ब्रँडच्या शॉपच्या उद्घाटनानिमित्त बिग बी अयोध्येमध्ये गेले होते. उद्घाटनानिमित्त बिग बींनी दुसऱ्यांदा प्रभु श्री रामाचे दर्शन घेतले आहे. सध्या ते दर्शनाला जातानाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यावेळी बिग बींनी प्रभु श्री रामाची पुजा सुद्धा केली.

एएनआय वृत्तसंस्थेने त्यांच्या एक्स हँडलवरून बिग बी दर्शन घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी बिग बी प्रभु श्रीरामाच्या दर्शन घेताना दिसत आहे. प्रभु श्री रामाच्या मुर्तीसमोर हात जोडून उभे राहिलेले दिसत आहेत. यावेळी बिग बींनी पांढरा कुर्ता पायजमा आणि कोट वेअर केलेले दिसत आहे. यावेळी त्यांच्यासोबत तेथील पोलिस आणि पुजारीही देखील दिसत आहेत.

माध्यमांसोबत संवाद साधताना बिग बी म्हणाले, "मी २२ जानेवारीनंतर आज पुन्हा एकदा अयोध्येमध्ये आलोय. यापुढेही माझे अयोध्येमध्ये येणे जाणे चालतच राहिल. बरेच लोक म्हणतात की तुम्ही फिरलेच नाहीत तर तुमच्यासोबतचे नाते कसे काय वाढतील. माझा जन्म इलाहाबादचा आहे. मी त्यानंतर पुढे अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये माझ्या कुटुंबासोबत राहिलो. मला माझे बापुजी सांगायचे तु कुठेही जा तुझे नाते उत्तरप्रदेशसोबत कायम जोडलेले ठेव. शेवटी मी कुठेही राहिलो तरीही माझे नाते उत्तर प्रदेशसोबत कायम जोडलेले राहतील. मला ‘छोरा गंगा किनारे वाला’च म्हटले जाते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: काकडी कापण्यापूर्वी ती घासली का जाते? 'या' कारणांमुळे तुम्हीही कराल हा प्रयत्न

Heart attack young age: आजकाल कमी वयात का येतो हार्ट अटॅक? तज्ज्ञांनी सांगितलं तरूणांमध्ये हृदयविकार वाढण्याची कारणं

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

SCROLL FOR NEXT