BBMarathi Update INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

BBMarathi Upadate : बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एंट्री ! कोण आहे रांगडा गडी?

Wild Card Entry In Big Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या सीजन ५ मधील पहिली वाइल्ड कार्ड एंट्री आज होणार आहे. याचा एक प्रोमो सोशल मिडियावर टाकण्यात आला आहे. ही वाइल्ड कार्ड एंट्री कोणाची आहे ही बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Saam Tv

BBMarathi season 5 : बिग बॉसच्या घरात आज एक रांगडा मर्द गडी येणार आहे. ही या सीजनची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री असणार आहे. या संदर्भातील एक रोमो कलर्स मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात घरात येणाऱ्या नव्या सदस्यांची जबरदस्त एंट्री दाखवण्यात आली आहे. घरात आणखी एक कोल्हापूरचा रांगडा गाडी येणार आहे.

घरात दररोज काहीतरी नवीन घडतं. निक्कीच्या चुका आणि भांडणं असोत किंवा घरातल्यांचे राडे यासगळ्यावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. भाऊच्या धक्क्यावर सगळ्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळते. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीला शिक्षा सुनावली आणि तिची कॅप्टन्सी काढून घेतली. त्यासोबतच घनश्याम दरोडे या आठवड्यात घराबाहेर गेला. मात्र आता त्याच्याजागी दुसऱ्या व्यक्तीची 'बिग बॉसच्या घरात एंट्री झाली आहे. घरात आता सहावा आठवडा सुरू आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सीझन ५ दिवसेंदिवस आणखीनच आतुरता वाढवणारा ठरत आहे. या आठवड्यात सात जण घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड होते. त्यातील घनश्याम दरोडे याने घराचा निरोप घेतला. आता त्याजागी दुसऱ्या व्यक्तीची घरात एंट्री झाली आहे. प्रोमोमध्ये त्याचा चेहरा दिसत नसला तरी नेटकऱ्यांनी त्याला ओळखलं आहे. नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती संग्राम चौगुले आहे.

कोल्हापूरचा संग्राम चौगुले आहे तरी कोण ?

फिटनेस फ्रिक संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा लोकप्रिय बॉडीबिल्डर आहे. त्याने २०१२ साली साली मिस्टर युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. तर २०१४ साली तो मिस्टर वर्ल्ड बनला. त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. तो सध्या पुण्यात स्थायिक आहे. त्याने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केली आहे. आता संग्रामच्या घरात येण्याने आता घरातली समीकरणं बदलणार आहेत हे स्पष्ट आहे. तर दुसरीकडे चाहते त्याला निक्कीच्या नादाला लागू नकोस असा सल्ला देत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT