Mr.Universe canva
मनोरंजन बातम्या

'Mr.Universe' ते बिग बॉस, वाचा कोल्हापूरच्या रांगड्या गड्याच्या संघर्षाची कहाणी

Sangram Chougule Life Story: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात बॉडीबिल्डर संग्राम चौगुले याने पहिली वाइल्ड एन्ट्री केली. जाणून घ्या त्याच्या जिवनातील संघर्षमय प्रवास.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi Day 46 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाची पहिली वाइल्ड एन्ट्री संग्राम चौगुलेची झाली.कोल्हापूरचा बॉडीबिल्डर असणाऱ्या संग्रामचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे. फिटनेस फ्रिक असणारा संग्राम खरंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्याने याबद्दल भाष्य केलं आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्यांना आज संग्राम त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी सांगताना दिसणार आहे. संग्राम म्हणतोय,"इंजीनीअरिंग सोडून बॉडीबिल्डर होण्याचा मी निर्णय घेतला. मला शिक्षणात रस नसल्याचं मी थेट कॉलेजमध्ये जाऊन प्रमुखांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला.

तुला जे करायचं ते कर पण त्यात टॉप कर, असं ते मला म्हणाले होते. दरम्यान तीन हजार रुपयांची मला स्पॉनरशिप मिळाली. घरातून मला फक्त पाच हजार मिळायचे. त्यातला अडीच हजार रुपये भाडं, एक हजार रुपये जेवण आणि 1500 रुपयांत फक्त महिना काढावा लागत असे".

लाल मातीतले रांगडे गडी असणाऱ्या संग्रामच्या मनगटात ताकद आहे. बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा आहे. बलवान असणारे संग्राम आजच्या घडीला महाराष्ट्राची शान आहेत. संग्रामचा बिग बॉस मराठीच्या घरातला पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT