Abhijeet Bichukale Song:  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abhijeet Bichukale Song: राजकारणानंतर आता संगीत क्षेत्रात 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेचं पदार्पण, स्वत: लिहिलेलं गाणं उद्या होणार रिलीज

Ganesh Festival 2023: हे गाणं अभिजीत बिचकुले यांनी स्वत: लिहिलं असून या गाण्याला संगीतबद्ध त्यांनीच केलं आहेत. त्यासोबत या गाण्यात अभिनय देखील त्यांनीच केला आहे.

Priya More

Bigg Boss Fame Abhijeet Bichukale:

'बिग बॉस' (Big Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नेहमी चर्चेत राहतात. सध्या अभिजीत बिचकुले पुन्हा चर्चेत आले आहे आणि यामागचं कारणही तितक खास आहे. राजकारण, अभिनयानंतर आता अभिजीत बिचकुले संगीत क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. अभिजीत बिचुकले यांचं पहिलं वहिलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याबद्दल बिचुकले खूपच उत्सुक आहेत. महत्वाचे म्हणजे हे गाणं अभिजीत बिचकुले यांनी स्वत: लिहिलं असून या गाण्याला संगीतबद्ध त्यांनीच केलं आहेत. त्यासोबत या गाण्यात अभिनय देखील त्यांनीच केला आहे.

अभिजीत बिचुकले हे नाव ऐकल्यावर सर्वांना लगेच आठवतात ते म्हणजे 'बिग बॉस'मधील राडे आणि त्यांचे वेगवेगळे डायलॉग. बिग बॉसमुळेच अभिजीत बिचुकले चर्चेत राहिले आहे. त्यासोबत निवडणुकीला उभं राहून आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील ते चर्चेत राहिले आहेत. आता अभिजीत बिचुकले वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहेत. अभिजीत बिचुकले एक गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गणपती बाप्पावर आधारीत हे गाणं असणार आहे.

ऐन गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पावर आधारित गाणं अभिजीत बिचुकले यांनी तयार केलं आहे. त्यामध्ये अक्टिंग सुद्धा त्यांनी स्वतः च केली आहे.अभिजित बिचुकले अँड सन्स ड्रीम मर्चंट प्रोडक्शनच्या वतीने हे गाणं आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त अभिजीत बिचुकले यांच्याकडून संगीतप्रेमींसाठी हे गाणं खास मेजवाणी असणार आहे. या गाण्याबाबत सर्वजण खूपच उत्सुक आहेत. साताऱ्यातील राजलक्ष्मी टॉकीजच्या पाठीमागे असलेल्या क्रांती गणेशोत्सव मंडळमध्ये या गाण्याचे शूटिंग करण्यात आले आहे. गाण्याचे शूटींग बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

अभिजीत बिचकुले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'अभिजीत बिचुकले अँड सन्स ड्रीम मर्चंट प्रोडक्शनच्या वतीने माझं प्रोडक्शन हाऊस सुरू झालं. बॉलिवूडमध्ये सर्वांना गणपती बाप्पा आवडतो. मी हिंदीमध्ये गाणं लिहिलं आहे. त्याचं संगीत मी देत आहे. त्यामध्ये अॅक्टिंगसुद्धा मी करतोय. आनंद या गाण्याचे दिग्दर्शन करत आहेत. हे पहिलं बॉलिवूडमधील हिंदी श्री गणपती गीत आहे. उद्या संध्याकाळी हे गाणं रिलीज होणार आहे.'

दरम्यान, अभिजीत बिचुकले हे साताऱ्या जिल्ह्यातील बिचुकले या गावामध्ये राहतात. अभिजीत बिचुकले यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड आहे. ते लेखक, कवी आणि राजकारणी आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर अभिजीत बिचुकले यांना खरी ओळख मिळाली. बिग बॉसमुळेच ते चर्चेत आले. मराठी बिग बॉस सीझन २ मध्ये ते होते. त्यानंतर ते हिंदी बिग बॉसमध्ये देखील सहभागी झाले होते. त्यांनी नगरसेवक पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत निवडणूक लढवल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत आमदार आदित्य ठाकरे, खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT