Amitabh Bachchan At Siddhivinayak Temple Saam TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan At Siddhivinayak Temple: महानायक अमिताभ बच्चन अनवाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनला; VIDEO व्हायरल

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.

Pooja Dange

Amitabh Bachchan Seek Blessing Of Siddhivinayak Mandir:

'बिग बी' अमिताभ बच्चन वयाच्या ८० व्या वर्षी देखील काम करत आहेत. त्यांचे अनके चित्रपट आणि जाहिराती आपण पाहत असतो. पण यशाच्या शिवकारवार असताना देखील अमिताभ बच्चन नेहमीच आपल्याला शांत आणि संयमी दिसतात.

अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या ट्विटने लक्ष वेधून घेतात. पण आज अमिताभ बच्चन यांचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. झब्बा आणि लेंगा घातलेला अभिताभ बच्चन यांनी अंगाभोवती शाल गुंडाळली होती. तर बिग बी अनवाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. एखाद्या सर्वसामान्य भक्ताप्रमाणे अमिताभ बच्चन या व्हिडीओमध्ये सिद्धिविनायक मंदिरात जाताना दिसले.

'कोण बनेगा करोडपती' चा १५ व सीजन यशस्वीपणे लाँच झाल्यानंतर अमिताभ बच्चन सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांनी यावेळी सुरक्षा दिली होती.

अमिताभ बच्चन यांनी सिद्धिविनायकाची पूजा केली तसेच श्रीफळ आणि फळांचा नैवैद्य अर्पण केला. यावेळी अमिताभ बच्चन एकटेच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते. (Latest Entertainment News)

जेव्हा अमिताभ बच्चन यान उंचाई हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्यांच्यासोबाबत त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील त्यांच्यासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी केला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळाले आहे. तसेच यय अभिषेकचा घुमर हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.

अमाप प्रसिद्धी आणि संपत्ती असताना देखील बच्चन कुटुंब देवाच्या भक्तीत नेहेमीच लिन झालेलं पाहायला मिळत असते. बच्चन कुटूंब गेली अनेक वर्ष मुंबईच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला देखील जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT