Bhushan Pradhan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhushan Pradhan : गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीच्या दिवशी मराठमोळ्या अभिनेत्याने आई-वडिलांना दिलं खास गिफ्ट, पाहा...

Bhushan Pradhan New Home : सर्वत्र गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. अशात मराठी अभिनेता भूषण प्रधानने आपल्या आई-वडिलांना खास भेट दिली आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

Shreya Maskar

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधानने (Bhushan Pradhan) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. सध्या सोशल मीडियावर भूषण प्रधान चर्चा रंगली आहे. भूषणने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे चाहते भूषणचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. भूषणने आपण नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. भूषणने आपल्या आई-वडिलांसाठी स्वतःचे घर खरेदी केले आहे. त्यांनी स्वतःचे नवीन घर खरेदी केले आहे.

सध्या भूषणच्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये भूषण गुढग्यावर बसून घराच्या किल्ल्या आई-वडिलांच्या स्वाधीन केल्या आहेत. तसेच भूषणने या फोटोंना सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi) शुभ मुहूर्तावर भूषणने नवीन घर ( New Home ) घेऊन आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. भूषणचं कौतुक केलं आहे.

हृदयाला भिडणारे कॅप्शन त्यांनी फोटोंना दिले आहे. भूषणने लिहिलं की, गेल्या ६ महिन्यांपासून मला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आहे. 'जुनं फर्निचर' आणि 'घरत गणपती' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. 'जुनं फर्निचर' या चित्रपटामुळे पालकांचं वय वाढत असताना त्यांना एक सुरक्षित आयुष्य कसे द्यायचे याचा फार जवळून अनुभव घेता आला. आता स्वप्न पूर्ण झालं आहे. मी मी माझ्या पालकांसाठी नवीन घर घेतलं आहे. मला स्वप्न साकार करायला गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिले आहेत. ही एक आमची नवी सुरुवात आहे. गणपती बाप्पा मोरया! असे म्हणत भूषणने सुंदर पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांचा देखील उल्लेख केला आहे.

भूषण प्रधानचे चित्रपट

भूषणने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये कॉफी आणि बरंच काही, जुनं फर्निचर असे चित्रपट केले आहे. नुकताच तो 'घरत गणपती' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT