Bhumika Chawla and Salman Khan Seen together after 20 years  Saam TV
मनोरंजन बातम्या

Bhumika-Salman Story: भूमिका - सलमान २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र, 'तेरे नाम' वेळचा किस्सा ऐकून सगळे झाले शॉक

Bhumika Chawla At Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Launch: भूमिका चावला आणि सलमान खान यांच्या एका व्हिडिओ साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

Pooja Dange

Bhumika Chawla Share 20 years old Incident With Salman : सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चा ट्रेलर लाँच सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात अनेक चित्रपटातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील अनेक गंमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर भूमिका चावला आणि सलमान खान यांच्या एका व्हिडिओ साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'किसी का भाई किसी की जान' ट्रेलर लाँच कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी मुंबईत पार पडला. यावेळी सलमान त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसला. दरम्यान ट्रेलर लाँच सोहळ्यात भूमिका चावला आणि सलमान अनेक वर्षांनी एकत्र दिसले.

'किसी का भाई किसी की जान'मध्ये भूमिका चावलाही दिसणार आहे. ट्रेलर लाँचदरम्यान त्यांनी काही जुने किस्से सांगितले. 20 वर्षांपूर्वी आलेल्या 'तेरे नाम' या तिच्या डेब्यू चित्रपटादरम्यान भूमिकाने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली होती. भूमिकाने सांगितलेला किस्सा ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

भूमिका चावला म्हणाली, “तेरे नामच्या ऑडिओ लॉन्चच्या वेळी मी स्टेजवर गेलो आणि म्हणाले, ‘सलमान भाईसोबत काम करताना मला खूप आनंद झाला आणि हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटले. हे खरोखरच घडले." यानंतर भूमिका म्हणाली की आज मी तुला सलमान भाई म्हणणार नाही. सलमानने लगेच विचारले, "असा काय बदल झाला आहे?"

15 ऑगस्ट 2003 रोजी रिलीज झालेला तेरे नाम हा भूमिका चावलाचा पहिला चित्रपट होता. यामध्ये तिने निर्जरा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमान खानने राधेची भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट झाला होता. नंतर भूमिकाने अनेक चित्रपट केले पण तिला यश मिळवता आले नाही.

'तेर नाम' चित्रपटातील निर्जरा आणि राधे यांची प्रेमकथा सर्वांना खूप आवडली होती. निरागस निर्जरा आणि बिनधास्त राधे यांच्यावर हा चित्रपट आधारित होता. २० वर्षानंतर भूमिका आणि सलमान पुन्हा एकदा दिसणार आहेत. परंतु यावेळी त्यांच्या भूमिका वेगळ्या असणार आहेत. २० वर्षांनंतर सलमान जरी लीड हिरो असला तर भूमिका मात्र लीड हिरोईनच्या वाहिनीची भूमिका साकारत आहे.

या ईदनिमित्त सलमान खान चाहत्यांसाठी 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट घेऊन येत आहे. यात त्याच्या सोबत पूजा हेगडे दिसणार आहे. व्यंकटेश डग्गुबती, भूमिका चावला, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल आणि पलक तिवारी यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT