Famous Producer Dies
Famous Producer Dies  Saam TV
मनोरंजन बातम्या

Famous Bhojpuri Director Dies: प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू; हॉटेलचे दार उघडताच दिसलं भयंकर दृश्य

Ruchika Jadhav

Producer and Director Subhash Chandra Tiwari: मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. त्यांच्या निधनाने सिनेविश्वात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. काल अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचे देखील निधन झाले. तसेच प्रसिद्ध अभिनेते नितिश पांडे यांच्या निधनाने सिनेसृष्टी हादरून गेली. हा दु:खाचा डोंगर कमी होत नाही तोच आता प्रसिद्ध निर्मात्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. (Entertainment News in Marathi)

उत्तर प्रदेशातली रॉबर्ट्सगंज येथील एका हॉटेलात भोजपुरी निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष चंद्र तिवारी यांचा मृत्यू झाला आहे. संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. चित्रीकरण संपवून सुभाष तिवारी हॉटेलात रात्री उशिरा आले होते. बराच वेळ त्यांनी आपल्या खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे उपस्थितांनी हॉटेलचे दार तोडले. दार उघडताच समोरील दृश्य पाहून अनेकांच्या काळजात धडकी भरली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष चंद्र तिवारी हे वाराणसीचे रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्या आगामी 'दो दिल बंधे एक डोरी से' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते आपल्या ४० सदस्यांसह ११ मे रोजी या हॉटेलमध्ये दाखव झाले. त्यानंतर शूटींग संपेपर्यंत सर्वजण येथेच थांबले. शूटींग संपूण आता दोन दिवस झाले होते. मात्र घरी परतण्याआधीच सुभाष यांची प्राण ज्योत मालवली.

हॉटेल मालकाने या प्रकरणाची माहिती रॉबर्टसगंज पोलीस ठाण्यात दिली. सिंग यांनी सांगितले की, पोलिसांनी दरवाजाचा भाग कापून दरवाजा उघडला तेव्हा त्यांना तिवारी यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. सदर घटनेनं पुन्हा एकदा मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT