Monalisa Viral Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Monalisa Viral Photos: 'त्याने माझे हृदय चोरले....' मोनालिसाची पोस्ट होतेय व्हायरल

सोशल मीडियावरही मोनालिसा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे विविध फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Monalisa Instagram Post Viral: भोजपुरी सिनेसृष्टीत टॉप अभिनेत्रीच्या यादीत मोनालिसाच्या नावाची गणना केली जाते. मोनालिसाने अभिनय आणि नृत्याने भोजपुरी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भोजपुरी सिनेमासृष्टीसह मोनालिसा बॉलिवूड आणि टॉलिवुडमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही मोनालिसा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे विविध फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच मोनालिसाने तिचे नवीन लूकमधील फोटो पोस्ट केले आहे जे सोशल मीडियावर साऱ्याचं लक्ष वेधून घेत आहेत.

नुकतेच मोनालिसाने एथनिक गेटअपमधील फोटो पोस्ट केले आहेत. मोनालिसाचे फोटो पाहून अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. मोनालिसाने ब्रायडल लूकमधले फोटो शेअर केले आहेत. भरगच्छ दागिन्यांमध्ये मोनालिसा अप्रतिम दिसतेय. यासह मोनालिसाने फोटोला कॅप्शन दिलं आहे जे साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. मोनालिसाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.(Latest Entertainment News)

अभिनेत्री मोनालिसाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने भोजपुरी सिनेमासृष्टीत नावं कमावलं आहे. मोनालिसाचा जन्म २१ डिसेंबर १९८२ रोजी कोलकत्ता येथे झाला आहे. मॉडेलिंगपासून मोनालिसाच्या करिअरची सुरूवात झाली. बॉलिवूडमध्ये मोनालिसाच्या नावाचा गाजाबाजा आहे. मोनालिसाने २००५ मध्ये 'ब्लॅकमेल' या सिनेमात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मोनालिसाने भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये मोनालिसा ब्रायडल लूकमध्ये दिसते आहे. लाल रंगाच्या लेहेंग्यात सौंदर्य खुललं आहे. मोनालिसाने भरगच्छ ज्वेलरीसह मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे. सोशल मीडियावर मोनालिसाला लाखो चाहते फॉलो करतात. जे तिच्या या नव्या लूकवरही आवर्जून प्रतिक्रिया देत आहेत. मोनालिसाने फोटो शेअर चाहत्यांना धक्काच दिला आहे. तिने, त्याने माझे हृदय चोरले आणि मी त्याचे आडनांव, तू माझा आहेस आणि माझाच राहणार...असं कॅप्शन देत तिने विक्रांत सिंह राजपूतला टॅग देखील केलं आहे.

'बिग बॉस'मधील विक्रांत आणि मोनालिसाचे लग्न खूप गाजले होते. विक्रांत आणि मोनालिसा हे भोजपुरी इडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. मोनालिसा आणि विक्रांतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. लग्न करण्यापूर्वी विक्रांत आणि मोनालिसा एकमेकांना १० वर्षे डेट करत होते आणि दोघेही लिव्ह-इनमध्ये होते. विक्रांत आणि मोनालिसाची पहिली भेट २००८ मध्ये 'दुल्हा अलबेला'च्या सेटवर झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि २०१७ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT