Bharti Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह होणार रिटायर; म्हणाली, 'मग मी काम थांबवेन...'

Bharti Singh Retirement: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहने अलीकडेच आपल्या निवृत्तीबद्दल विचार व्यक्त केला आहे. तिच्या मते, ती आणखी ८ ते १० वर्षे काम करून नंतर काम थांबवण्याचा विचार करते.

Shruti Vilas Kadam

Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहने अलीकडेच आपल्या निवृत्तीबद्दल विचार व्यक्त केला आहे. तिच्या मते, ती आणखी ८ ते १० वर्षे काम करून नंतर काम थांबवण्याचा विचार करते. भारतीने तिच्या व्लॉगमध्ये सांगितले की, "मी हर्षला सांगितले आहे की आता मला काम करायचे नाही. मला माझ्या मुलासोबत बाहेर फिरायला जायचे आहे. ८-१० वर्षे आणखी, मग मी काम थांबवेन."

भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी २०१७ मध्ये विवाह केला आणि २०२२ मध्ये त्यांना मुलगा झाला, ज्याला ते प्रेमाने 'गोला' म्हणतात. ती म्हणाली, "आता गोला ३ वर्षांचा आहे, जेव्हा तो १३ वर्षांचा होईल, तेव्हा आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जाऊ."

निवृत्तीनंतरच्या आयुष्याबद्दल बोलताना भारतीने सांगितले की, ती आणि हर्ष मुंबई सोडून एखाद्या गावात स्थायिक होण्याचा विचार करत आहेत. ती म्हणाली, "हर्षला खूप वाटते की आपण एखाद्या गावात जाऊन एक गाय, काही कोंबड्या पाळाव्यात. माझी खूप इच्छा आहे की मी शेतातून ताज्या भाज्या आणून स्वयंपाक करू." ​

भारतीने तिच्या मुलाच्या स्वावलंबनाबद्दलही विचार मांडले आहेत. ती म्हणाली, "मी इच्छा आहे की माझा मुलगा १६-१८ वर्षांचा झाल्या की त्याने स्वतः काम करावा, जसे परदेशात मुले शिक्षणासोबत काम करतात. त्यामुळे तो स्वतःच्या खर्चाची जबाबदारी घेऊ शकेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT