Firoz Khan Dies Of Heart Attack Saam Tv
मनोरंजन बातम्या

Firoz Khan Dies : 'भाभीजी घर पे है' फेम फिरोज खान काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Firoz Khan Dies Of Heart Attack : मिमिक्री आर्टिस्ट आणि टेलिव्हिजन अभिनेता फिरोज खान यांचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मिमिक्री आर्टिस्ट आणि टेलिव्हिजन अभिनेता फिरोज खान यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज खान यांचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झयक्यामुळे झालेले आहे. 'भाभी जी घर पर है' आणि 'शक्तीमान' यांसारख्या फेमस टेलिव्हिजन कॉमेडी शोमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. फिरोज खान यांची इंडस्ट्रीमध्ये, डुप्लिकेट अमिताभ बच्चन म्हणून ओळख होती.

मीडिया रिपोर्टनुसार, फिरोज खान यांचे निधन २३ मे रोजी उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून फिरोज खान बदायूंमध्येच राहायला होते. ते त्यांचे मुळ गाव आहे. जेव्हापासून ते तिथे राहायला गेले आहेत. तिथल्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. फिरोज खान यांचा शेवटचा कार्यक्रम ४ मे रोजी पार पडलेला ठरला. बदायूं क्लबच्या मतदार महोत्सवामध्ये त्यांचा शेवटचा परफॉर्मन्स सादर केला होता.

फिरोज खान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, फिरोज खान यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी, त्यांचे चाहते आणि त्यांचे कुटुंबीय फिरोज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करीत आहेत.

फिरोज खान यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, त्यांनी अनेक कॉमेडी टेलिव्हिजन सिरीयलमध्ये, काम केले आहे. ‘जिजाजी छत पर है’, ‘भाभीजी घर पर है’, ‘हप्पू की उल्टान पलटन’, ‘साहिब बिवी और बॉस’ आणि ‘शक्तीमान’ सारख्या अनेक सीरियल्स त्यांच्या हिट सीरियल्स ठरल्या आहेत.

फिरोज खान हे फक्त अमिताभ बच्चन यांचीच नक्कल करीत नव्हते. तर, दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचीही ते नक्कल करायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

SCROLL FOR NEXT