Bangladeshi Actress Humaira Himu Death Saam Digital
मनोरंजन बातम्या

Bangladeshi Actress Humaira Himu Death: अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, वयाच्या ३७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bangladeshi Actress Humaira Himu Death

बांग्लादेश चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमीसमोर आली आहे. बांग्लादेशातील अभिनेत्र्यांपैकी एक असलेली अभिनेत्री हुमैरा हिमू हिचा वयाच्या अवघ्या ( ३७) व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनूसार, अभिनेत्रीने ( दि.२ )मंगळवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. तसंच हुमैरा हिमूची तब्येत अचानक खालावली, त्यानंतर तिला तात्काळ बांग्लादेशची राजधानी ढाका येथील 'उत्तरा मॉडर्न मेडिकल कॉलेज' रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेत्री हुमैरा हिमूने २००६ मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ती अनेक बांगलादेशी मालिकांमध्येही दिसली आहे. 'छायाबिती' या टीव्ही मालिकेतून अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली. अभिनेत्रीने मोरशेदुल इस्लामच्या 'अमर बंधू रशीद' चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटातील त्यांचा अभिनय खूप आवडला होता.

मैरा हिमूची मृत्यू आकस्मिक की घातपात?

अभिनेत्री हुमैरा हिमू हिच्या मृत्यूचे कारण सध्यातरी समजू शकले नाही. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांना अभिनेत्रीच्या मानेवर काही जखमा दिसल्या आहेत. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. यादरम्यान अभिनेत्रीसोबत रुग्णालयात उपस्थित असलेला तिचा मित्र विनोद हा पोलीस रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच फरार झाला होता. सध्या पोलीस त्या मित्राच्या शोधात आहेत. अभिनेत्रीच्या आकस्मिक मृत्यूमुळे तिचे कुटुंबीय आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.

पोलीस या प्रकरणाचा सगळ्या बाजुने तपास करत आहेत .अशातच असे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद होऊन अभिनेत्रीने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. मात्र या गोष्टीचा ठोस पुरावा अद्याप ही पोलिसांना मिळालेला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर अभिनेत्रीच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असं पोलिसांचे म्हणणे आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT