Baipan Bhaari Deva Box Office Collection  Saam TV
मनोरंजन बातम्या

Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा'च्या कमाईत विक्रमी वाढ; ३ दिवसात केली १० कोटींहून अधिक कमाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Baipan Bhaari Deva 10th Day Collection : 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. 'बाईपण भारी देवा'या मराठी चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक हिंदी चित्रपटांनाही मागे टाकले आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला आहे. नुकताच चित्रपटाला दुसरा आठवडा पूर्ण झाला आहे. दुसऱ्याही आठवड्यात चित्रपटाने पहिल्या आठवड्यापेक्षा दुपट्टीने कमाई केली आहे.

'बाईपण भारी देवा' चित्रपटात सहा बहिंणींची गोष्ट आहे. बरेच मतभेद असूनही शेवटी प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होणाऱ्या या बहिणींची गोष्ट प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. प्रत्येक स्त्री या चित्रपटाला स्वतः च्या आयुष्याशी रिलेट करते. स्वतः च्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी पडद्यावर पाहण्यासाठी चित्रपटागृहाबाहेर विशेषतः महिलांची खूप गर्दी होतेय. महिलांनी चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे.(Latest Entertainment News In Marathi)

केदार शिंदे दिगदर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६.१० कोटींची कमाई केली. पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. त्यानंतर मात्र चित्रपटाने मागे वळून पाहिले नाही. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १३.५० कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यातील कमाईनंतर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने दुप्पटीने कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २६.१९ कोटी इतकी कमाई केली आहे.

चित्रपटाच्या कमाईची माहिती दिग्दर्शक केदार शिंदेनी सोशल मीडियावरुन दिली आहे. 'नि: शब्द.. काही घटना आयुष्यात घडतात त्या फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी. हे सगळं अनाकलनीय आहे. त्यावर निर्विवाद वर्चस्व आहे ते.. मायबाप प्रेक्षकांचं. त्या परमेश्वराचा आशिर्वाद..

हा सिनेमा आता आमचा राहीला नाही. तो प्रेक्षकांचा झाला आहे. अनेक विक्रम प्रेक्षकांच्या नावे या सिनेमाने निर्माण करावेत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. श्री सिध्दीविनायक...' असं कॅप्शन देत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

'बाईपण भारी देवा' चित्रपटात मंगळागौरीसाठी जमलेल्या सहा बहिणींची गोष्ट दाखवली आहे. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब अशी स्टारकास्ट झळकली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

SCROLL FOR NEXT