Baal Bharati Poster Instagram/ @siddharth23oct
मनोरंजन बातम्या

BaalBhaarati Motion Poster: यंत्रांशी करून गट्टी, चाईनस्टाईन देतोय प्रत्येक प्रॉब्लेमला सुट्टी, 'बालभारती'चा पोस्टर चर्चेत

'बालभारती' म्हटल्यावर शाळेतील मराठी विषयाच्या पुस्तकाची आठवण येते. याच आठवणी आणखी वेगळ्या जागवण्यासाठी दिग्दर्शक नितिन नंदन सज्ज झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BaalBhaarati Motion Poster Out: 'बालभारती' म्हटल्यावर शाळेतील मराठी विषयाच्या पुस्तकाची आठवण येते. याच आठवणी आणखी वेगळ्या जागवण्यासाठी दिग्दर्शक नितिन नंदन सज्ज झाले आहेत. 'बालभारती' हा धमाल बालविश्व उलगडणाऱ्या चित्रपटात कॉमेडी स्टार सिद्धार्थ जाधव आणि नंदिता पाटकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

शेअर केलेल्या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये आईनस्टाईनच्या पात्रात दिसणारा बालकलाकार 'आर्यन मेघंजी' दिसणार आहे. फिरत्या पेंडुलमच्या पार्श्वभूमीत त्यांच्यावर ए, बी, सी, डी लिहिलेले हे गॅझेट घेऊन तो खेळत आहे. 'टॉक इन इंग्लिश'चे हेल्मेट नंदिताने घातले आहे.

अभिजीत लहान आईनस्टाईनची स्तुती करताना दिसतोय. प्रत्येक चित्रपटात कॉमेडी भूमिका करणारा सिद्धार्थ जाधव मजेशीरपणे इंग्रजी ते मराठी शब्दकोश वाचताना दिसत आहे. पोस्टरच्या शेवटी प्रेक्षकांना 'मीट द न्यू चेनस्टाईन'ची ओळख करुन देत आहे.

'बालभारती' चित्रपटाबद्दल बोलताना 'स्फियरओरिजीन्स'चे संस्थापक संजोय वाधवा म्हणतात, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिभावान मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही एका मराठी कुटुंबाची कथा तर आहेच, पण सोबतच ही मराठी माध्यमाच्या शाळेची कथाही आहे. बदलत्या काळाबरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये ही शाळा कसे परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प करते, हे बघणे नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. एक सामाजिक संदेश दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Ladki Bahin Yojana KYC: उरला फक्त आठवडा! लाडक्या बहिणींनो आजच eKYC करा, अन्यथा ₹१५०० विसरा

Maharashtra Weather Update : पुणे महाबळेश्वरपेक्षा थंड, धुळ्यात पारा ८.६ अंशावर; राज्यात थंडीची जोरदार एंट्री

Success Story: जिद्द! एकदा नव्हे तर ६ वेळा MPSC क्रॅक; नांदेडचा लेक झाला क्लास १ ऑफिसर; ओमकेश जाधव यांचा प्रवास

Lucky Zodiac Signs: 11 नोव्हेंबरपासून 'या' राशींचं नशीब चमकणार; शतांक योगाने नुसता पैसाच नाही तर करियरमध्येही मिळणार संधी

SCROLL FOR NEXT