Avatar 3 First Look 
मनोरंजन बातम्या

Avatar 3: 'अवतार ३' ची पहिली झलक आली समोर; २१,५६,२८,५८,७५० रुपयांमध्ये बनवल्या चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित

Avatar 3 First Look: 'अवतार: फायर अँड अॅश' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. त्यात खलनायक वरंगची झलक आहे. ही भूमिका अभिनेता उना चॅप्लिनने साकारली आहे.

Shruti Vilas Kadam

Avatar 3 First Look: जेम्स कॅमेरॉन यांच्या बहुप्रतिक्षित 'अवतार: फायर अँड अॅश' या चित्रपटाची पुढील कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या खलनायक 'वरंग'ची पहिली झलक 'अवतार ३' मधून दाखवण्यात आली आहे. निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे देखील जाहीर केले आहे. या चित्रपटाचे बजेट २५ कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच २१,५६,२८,५८,७५० भारतीय रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

'अवतार' फ्रँचायझीचा नवीन भाग या वर्षी १९ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या या चित्रपटाबद्दल अधिक उत्सुक्ता निर्माण झाली आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये खलनायक वरंगचा चेहरा आहे. हे पात्र उना चॅप्लिन साकारत आहे. वरंगला मांगकवान कुळाचा किंवा अॅश पीपलचा नेता म्हटले जात आहे. नावी ज्वालामुखीजवळील अग्निमय भागात राहतात, जे पेंडोराच्या वातावरणात नवीन आहेत.

'अवतार ३' चा ट्रेलर कधी येणार?

निर्मात्यांनी पहिल्या पोस्टरसोबत चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे देखील सांगितले आहे. पोस्टर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'अवतार: फायर अँड अॅशमधील वरंगला भेटा. या आठवड्याच्या शेवटी थिएटरमध्ये 'द फॅन्टास्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स' सह ट्रेलर पाहणाऱ्यांपैकी एक व्हा.' २५ जुलै २०२५ रोजी या चित्रपटाच्या रिलीजसह ट्रेलर लाँच केला जाईल.

'न्यू यॉर्क टाईम्स'मधील वृत्तानुसार, 'अवतार ३' चा ट्रेलर अलीकडेच डिस्नेच्या लॉस एंजेलिस आणि न्यू यॉर्क कार्यालयात दाखवण्यात आला. यामध्ये, खलनायक वरंग लाल आणि काळ्या रंगाचा मुकुट घातलेला दाखवण्यात आला आहे.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT