Athiya-KL Rahul  Instagram @athiyashetty
मनोरंजन बातम्या

Athiya- K.L Rahul Wedding: अथिया- राहुलच्या ड्रेसची चर्चाच निराळी, ड्रेस मागील मेहनत ऐकाल तर चक्रावुन जाल...

खास पोज देताना सर्वांचंच लक्ष गेलं ते कपड्यांवर. दोघांच्याही साध्या आणि सिंपल लुकने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले होते.

Chetan Bodke

Athiya- K.L Rahul Wedding: गेल्या अनेक दिवसांपासून अथिया आणि राहुलच्या लग्नाची चर्चा होत होती. अखेर त्यांनी त्यांनी काल सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये लग्नगाठ बांधली. लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांनी लगेचच सोशल मीडियावर खास फोटोही शेअर केले. दोघांचेही खास फोटो पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे. यावेळी दोघांच्याही कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते.

सोबतच या जोडीने फार्म हाऊसमधून बाहेर पडताना माध्यमांसमोर खास पोजही दिल्या. खास पोज देताना सर्वांचंच लक्ष गेलं ते कपड्यांवर. दोघांच्याही साध्या आणि सिंपल लुकने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले होते.

अथियाने डिझायनर अनामिका खन्नाने डिझाईन केलेला पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. डिझायनरने खूप मेहनत घेत, स्वतः तयार करत (hand made) लेहेंगा डिझाईन केला होता. त्यावर जरदोजी आणि जाळी वर्कसह सिल्कचे वर्क होते. तर, अथियाचे ब्लाऊज आणि ओढणी सिल्क ऑर्गन्झाने बनलेला होता. हा सुंदर लग्नाचा लेहेंगा तयार करण्यासाठी अनेक दिवस लागले असल्याचे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलंय.

यासोबतच तिच्या दागिन्यांनीही सर्वांचे लक्ष वेधले होते. अगदी मोजक्याच दागिन्यांचा साज करत अथियाने आपला लूक पूर्ण केला होता.

नवरदेव राहुलने हलके नक्षीकाम असलेली शेरवानी व दुपट्टा परिधान केला होता. दोघांनी लग्नात अगदी सिंपल लूक केला होता. या लूकमध्ये दोघेही अत्यंत सुंदर दिसत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT