Athiya-KL Rahul Instagram @athiyashetty
मनोरंजन बातम्या

Athiya-KL Rahul Wedding: अथिया-केएल राहुलच्या लग्नाला मुहूर्त मिळाला, पण रिसेप्शनचं काय?

सुनील शेट्टीने दिली अथिया आणि केएल राहुलच्या रिसेप्शनची माहिती.

Pooja Dange

Athiya Shetty - KL Rahul Wedding Reception: बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल सोमवारी 23 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. बॉलिवूड आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.

सुनील शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर लग्नाचे सर्व विधी पार पडले. अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे.

अथिया आणि केएल राहुल यांचे लग्न अतिशय खास पद्धतीने झाले. त्यांच्या लग्नाचे कपडे सब्यसाचीने डिझाइन केले होते. अथिया आणि केएल राहुल यांनी सुनील शेट्टीच्या खंडाळा बंगल्यावर लग्नबंधनात अडकले.

केएल राहुल, त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांची रॅडिसन हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या हॉटेलपासून केएल राहुलची वरात निघाली. दुपारी अडीचच्या सुमारास खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या घरी वरात पोहोचली. तेथे सुनील शेट्टी आणि त्याच्या पत्नीने वऱ्हाडाचे स्वागत केले.

लग्नसोहळ्यानंतर सुनील शेट्टी मीडियाला भेटायला आले. तसेच त्यांनी पापाराझींना मिठाईही वाटली. सुनीलने पेस्टल गुलाबी रंगाचे धोतर आणि कुर्ता परिधान केला होता. यावेळी सुनील शेट्टीचे सोबत त्याचा मुलगा आहान शेट्टी देखील होता.सुनील शेट्टीला लग्नाविषयी आणि जावयाबद्दल विचारले असता तो म्हणाल की, मला केएल राहुलचे सासरा नाही तर वडील व्हायचे आहे. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केएल राहुल त्याच्या आगामी आस्ट्रेलिया दौऱ्याचा उपकर्णधार आहे. या दौऱ्यानंतर लगेच आयपीएल सुरु होणार आहे. तेव्हा तो लखनऊ संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. तसेच अथियाने देखील नुकतेच तिचे युट्यूब चॅनेल लाँच केले आहे. दोघेही त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचे रिसेप्शन नंतर होणार आहे, असे सुनील शेट्टीने सांगितले.

21 जानेवारीपासून अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले होते. २२ जानेवारीला हळदीचा सोहळा पार पडला. २३ जानेवारीला त्यांचा विवाह सोहळा पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT