Actress Athiya Shetty and Indian cricketer K.L. Rahul  Saam Tv
मनोरंजन बातम्या

लग्नाची अफवा पसरली, अथिया म्हणाली, या लग्नाला मला पण बोलवतील..

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्यामुळे चर्चेत असलेल्या या कपलबद्दल एक बातमी आली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल(KL Rahul) खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्यामुळे चर्चेत असलेल्या या कपलबद्दल एक बातमी आली आहे की, अथिया आणि राहुल येत्या तीन महिन्यांत लग्न करणार आहेत आणि त्याची तयारी जोरात सुरू आहे. पण वृत्ताला पूर्णविराम देत अथियाने एक मजेशीर पोस्ट इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर करून याचे खंडन केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के.एल. राहुल येत्या तीन महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. या बातमीमुळे हे कपल खूप चर्चेत आहे. अथियाने नुकतेच या बातमीसंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मजेदार पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये लग्नाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. 'मला आशा आहे की पुढील ३ महिन्यांत होणाऱ्या या लग्नासाठी मला आमंत्रित केले जाईल'. असे अथियाने तिच्या पोस्टमध्ये लिहून या अफवांना पूर्णविराम लावला आहे.

मंगळवार पासून प्रसारमाध्यमांकडून असा दावा करण्यात आला की अथिया शेट्टी आणि के.एल. राहुल लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाबाबत अशी चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. परंतु, दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दुसरीकडे, आकाशवाणी सोबत केलेल्या मुलाखतीत अथियाचे वडील सुनील शेट्टीला विचारण्यात आले की, कुटुंबाने लग्नाची तयारी सुरू केली आहे का? त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'नाही, अद्याप काहीही प्लॅन केलेले नाही!'

अथिया शेट्टी आणि के.एल. राहुल जवळपास ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी त्यांच्या नात्याविषयी सर्वाना सांगितले. खरं तर, अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या 'तडप' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला राहुलही पोहोचला होता. यावेळी दोघेही पहिल्यांदाच एकत्र दिसले आणि अथिया आणि के.एल. राहुल एकमेकांना डेट करत असल्याचे समजले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT