Asit Modi-Disha Vakani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Asit Modi-Disha Vakani : दिशा वकानीनं असित मोदींना बांधली राखी, 'दयाबेन'ची TMKOCमध्ये होणार एन्ट्री?

Asit Modi-Disha Vakani Meet : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री दिशा वकानी आणि मालिकेचे निर्माते असित मोदी यांची भेट झाली आहे. यांच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

दिशा वाकानी आणि असित मोदी यांची भेट झाली आहे.

TMKOCमध्ये दयाबेनची पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) म्हणजेच दयाबेनची मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Kumarr Modi ) यांच्याशी भेट झाली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत.

दिशा वकानीने 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेन हे पात्र करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजही प्रेक्षक दयाबेन 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पुन्हा येण्याची वाट पाहत आहे. असित मोदींनी देखील 7 वर्षात दिशा वकानीच्या जागी दुसरी अभिनेत्री कास्ट केली नाही.

नुकताच रक्षाबंधन (Raksha Bandhan ) सण सर्वत्र साजरा केला गेला. तेव्हाच दिशा वकानी आणि असित मोदी यांची भेट झाली. असित मोदी रक्षाबंधन निमित्त दिशा वकानीच्या घरी गेले होते. याचा खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. असित मोदी आणि दिशा वकानी यांनी रक्षाबंधन साजरी केली. दिशा वकानीने असित मोदींना राखी बांधली, त्यांना ओवाळले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना गोड मिठाई भरवली. दोघेही एकमेकांच्या पाया देखील पडले. कुटुंबासोबत छान फोटो काढले. या दोघांनी चांगला वेळ घालवला.

असित मोदी यांनी व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "काही नाती नशिबाने जुळतात... ती रक्ताची नाती नसून हृदयाची नाती असतात...दिशा वकानी फक्त आमची 'दया भाभी' नाही ती माझी बहीण आहे. गेल्या काही वर्षात हास्य, आठवणी आणि आपलेपणा जपत हे नाते स्क्रीनच्या पलीकडे गेलं आहे. यंदा रक्षाबंधनला तोच अतूट विश्वास आणि तोच आपलेपणा पुन्हा एकदा जाणवला. हे नाते कायम इतक्याच गोड आणि मजबूती राहू दे हीच इच्छा..."

असित मोदींनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते दिशा वकानीला दयाबेनला पाहून आनंदी झाले आहेत. असित मोदी आणि दिशा वकानी यांच्या भेटीमुळे दयाबेन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये पुन्हा येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दिशा वकानीने 2017 साली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' शो सोडला. त्यानंतर ती आपल्या घर-संसारात व्यस्त झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर कायम दयाबेन शोमध्ये पुन्हा येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते. आता या फोटोंनी चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप दयाबेनच्या एन्ट्री विषयी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

SCROLL FOR NEXT