मुंबई : मराठीसहित हिंदी प्रेक्षकांवर वयाच्या पंच्याहत्तरीनंतरही आपल्या अभिनयाने भुरळ घालणारे अशोक सराफ पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करत आहेत. स्वत:च्या आयुष्यात अत्यंत शिस्तप्रिय काटेकोरपणे वागणारे अशोक सराफ मराठीतील एका मालिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेची आणखी एक खास गोष्ट म्हणजे रसिका वाखारकरदेखील त्यांच्यासोबत मालिकेत एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळेल. 'अशोक मा.मा.' असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेच्या प्रोमोमधील रसिका वाखरकरच्या अंदाजाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या मालिकेबद्दल रसिका म्हणाली ,"पिरतीचा वनवा उरी पेटला' ही आमची मालिका आणि माझं काम अशोक मामांना आवडायचं. या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामांसोबत काम करण्याचं माझं स्वप्न आता सत्यात उतरलं. भैरवी हे पात्र मी साकारावं यासाठी अशोक सराफ देखील खूप आग्रही होते. त्यांच्यासोबत कॅमेरा शेअर करताना मोठ्या जबाबदारीची जाणीव होते. अशोक सराफ हे समुद्रासारखे सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. त्यांनी सेटवर मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण केलं आहे'.
'ते आमच्या वयाचे होऊनच सेटवर वावरतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना कसलंही दडपण येत नाही. त्यांच्यासोबत काम करणं हे माझ्यासाठी खूप काही शिकवणारं आहे. इतक्या मोठ्या कलाकाराच्या सानिध्यात आता आपल्याला राहता येणार आहे, हीच मोठी गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
'या मालिकेत भैरवी मुजुमदार असं माझ्या पात्राचं नाव आहे. अतिशय स्ट्राँग, स्वतंत्र, उच्चशिक्षित, मॉर्डन अशा विचारांची मुलगी आहे. या मालिकेसाठी मी खूप उत्सुक असून आधी साकारलेल्या सावीपेक्षा अतिशय वेगळं पात्र आहे. अशोक मा.मा. या पात्रासोबत भैरवी वाद-विवाद घालताना दिसणार आहेत. अर्थात त्यालासुद्धा तितकचं स्ट्राँग कारण आहे. वेगळी गोष्ट असणाऱ्या या मालिकेची प्रेक्षकांप्रमाणे आता मलाही उत्सुकता आहे, असे रसिकाने सांगितलं. ही मालिका 25 नोव्हेंबरपासून रात्री 8.30 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही जीओ सिनेमावर पाहता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.