Ashok Saraf : ‘राजकमल एंटरटेनमेंट’ या नवीन प्रॉडक्शन हाऊसच्यामार्फत प्रेक्षकांना एक नवा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यवार अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अजून गुलदस्त्यातच असले, तरी या चित्रपटात अनेक वर्षांनी आपल्याला दिग्गज अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि हरहुन्नरी अभिनेत्री वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गाला नक्कीच हा चित्रपट एक मेजवानी ठरणार आहे. थोडी खट्याळ, थोडी गोंडस आणि थोडी हळवी अशी ही अनोखी गोष्ट या चित्रपटातून दिग्दर्शन लोकेश गुप्ते प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.
'राजकमल एंटरटेनमेंट' ही नवीन प्रोडक्शन कंपनी राहुल शांताराम यांची असून. राहूल शांताराम हे चित्रपती व्ही. शांताराम, ज्यांनी त्यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव आहेत. आपल्या आजोबांकडून प्रेरणा घेत, राहुल शांताराम यांनी हितकारक मनोरंजन देणारे चित्रपट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. असेच अशोक सराफ हे पहिल्यांदाच या चित्रपटातून त्यांच्या भाच्याच्या चित्रपटात काम करत आहेत.
अभिनेते अशोक सराफ या आगामी सिनेमाबद्दल आपलं मत व्यक्त करताना म्हणाले सांगितलं "बऱ्याच काळानंतर मला इतकी सशक्त भूमिका साकारण्यासाठी मिळाली आहे. चित्रपटाची गोष्ट सध्याच्या काळाशी सुसंगत आहे. दिग्दर्शक लोकेश गुप्तेने चित्रपटासाठी हा विषय निवडून अगदी सुरेख काम केलंय. शूटिंग दरम्यान त्याचा सिनेमा या माध्यमाचा अभ्यास आणि त्यावरील पकड मला दिसली. वंदना गुप्ते या हरहुन्नरी अभिनेत्रीसोबत मी यापूर्वीही काम केलंय. ती व्यक्ती आणि अभिनेत्री या दोन्ही स्वरूपात कमालीची उत्कट आणि हजरजबाबी आहे. तिचं आणि माझं गिव्ह-अँड-टेकचं टायमिंग छान आहे, त्यामुळे या दोन्ही पात्रांना उठावदारपणा आलाय. त्यामुळे आमच्याइतकी मज्जा प्रेक्षकांनासुद्धा चित्रपट बघताना येईल, असा विश्वास वाटतो."
सिनेमात काम करण्यासाठी उत्सुक असलेल्या वंदना गुप्ते मत व्यक्त करत म्हणाल्या, "सगळ्यांत आधी, 'राजकमल एंटरटेनमेंट'सोबत चित्रपट करणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर, अशोक सराफसारखे एक उत्तम अभिनेते चित्रपटात आहेत. अशोक सराफ हा अत्यंत कसलेला अभिनेता आहे. कॅमेऱ्याचा प्रत्येक अँगल, दिग्दर्शकाने लावलेली फ्रेम, या प्रत्येक पैलूचा त्याचा बारीक अभ्यास आहे. त्यानुसार आपल्या अभिनयाची शैली बदलत राहणं आणि मुख्य म्हणजे, आपल्या सोबतच्या प्रत्येक कलाकाराला पूर्णपणे कम्फर्टेबल करणं, यांत त्याचा हातखंडा आहे. या सुवर्णसंधीबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि पडद्यावरून प्रेक्षकांना भेटायला जाण्याची आतुरतेने वाट पाहतेय."
'राजकमल एंटरटेनमेंट'चा हा नवा चित्रपट नवीन वर्षी म्हणजेच १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या भेटीला येणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक अभूतपूर्व पर्वणी ठरणार हे नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.