Ashish Vidyarthi With Son Saam TV
मनोरंजन बातम्या

Ashish Vidyarthi On His Divorce : मुलाला अजूनही हे पचवण कठीण जात आहे... आशिष विद्यार्थींनी घटस्फोटावर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया

Ashish Vidyarthi Son Reaction : आशिष आणि राजोशी या दोघांनाही त्यांचा मुलगा 'अर्थ'ला ते दोघे विभक्त होत आहेत हे समजविण्यास बऱ्याच अडचणी आल्या.

Pooja Dange

Ashish Vidyarthi Son Arth Reaction On Parents Divorce: अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. वयाच्या 60 व्या वर्षी आशिष यांनी अभिनेत्याने रुपाली बरुआसोबत दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे आशिष सोशल मीडियावर ट्रोल देखील झाले होते.

एकीकडे प्रेमाला वय नसतं असं म्हणत असताना, दुसरीकडे काहीजण आशिष त्यांना ट्रोल करत होती. दुसऱ्या लग्नच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असताना आशिष यांनी अलीकडेच हे उघड केले आहे की राजोशी आणि त्याच्या घटस्फोटाचा त्यांच्या मुळावर काय परिणाम झाला? त्याने या प्रसंगावर त्याच्या कश्या व्यक्त केल्या. (Latest Entertainment News)

जेव्हा पती-पत्नी पालक बनतात तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलाच्या आयुष्याभोवती फिरते. पण त्यांनी हे विसरता कामा नये की, आई-वडीलसुद्धा माणसेच असतात आणि त्यांच्यातही मतभेद असू शकतात. एक वेळ अशी येते जेव्हा दोघांमधील मतभेद इतके वाढतात की कदाचित त्यांना एकत्र राहणे कठीण होऊन जातं.

असेच काहीसे आशिष विद्यार्थी आणि त्याची पहिली पत्नी राजोशी यांच्यात घडल्याचे दिसते. आशिष आणि राजोशी लग्नानंतर दोन दशकांहून एकत्र घालविल्यानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. परंतु आशिष आणि राजोशी या दोघांनाही त्यांचा मुलगा 'अर्थ'ला ते दोघे विभक्त होत आहेत हे समजविण्यास बऱ्याच अडचणी आल्या.

एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील या काळाबद्दल बोलताना आशिष यांनी सांगितले की, त्यावेळी आमच्या मनात खूप अपराधीपणा होता, कारण पिलू आणि दोन्ही मुलांना मी असे जीवन देऊ इच्छित नव्हतो.

आशिष आणि राजोशी यांना एकत्र राहणे आधी कठीण जात होते. जर ते अजून एकत्र राहिले असते तर त्यांच्यातील गोष्टी अजून बिघडल्या असत्या. इतकंच नाही तर दोघांनाही माहीत होतं की त्यांच्यात होणारा या बदलामुळे त्यांच्या मुलांवरही परिणाम होईल.

आशिष यांनी सांगितले की, अर्थशी बोलणे खूप अवघड होते. अर्थशी बोलताना ते खूप घाबरले होते. मात्र याविषयी समजल्यानंतर अर्थने आनंद व्यक्त केला. आशिष म्हणाले, 'त्याला आनंद झाला की त्याचे पालक एकमेकांना त्रास देण्याऐवजी त्यांच्यातील समस्या सोडवण्यासाठी पावले उचलत आहेत. असे असले तरीही त्याला हे पचवणे कठीण जात आहे.' (Actor)

कोलकाता येथे एका खाजगी समारंभात अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी फॅशन डिझायनर रुपाली लग्न केले. लग्नाविषयी बोलताना आशिष यांनी एका मीडिया आउटलेटला सांगितले होते की, 'माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक विलक्षण भावना आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज केले होते, त्यानंतर संध्याकाळी गेट-टूगेदर होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

अजितदादांच्या जाहीरनाम्यात मेट्रो प्रवास मोफत, फडणवीसांनी उडवली दादांची खिल्ली

रवींद्र चव्हाण पडले मौलवींचे पाया? मौलवी भाजपच्या सभेत?

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

Maharashtra Live News Update : विमानतळावर गरबा खेळला, पण गणपतीत ढोल-लेझीम वाजले नाहीत- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT