Ashish Vidyarthi Ex Wife Piloo On Divorce Saam Tv
मनोरंजन बातम्या

Piloo Vidyarthi Alimony: आशिष विद्यार्थींनी घटस्फोट घेतल्यानंतर पहिल्या पत्नीला दिली होती मोठी पोटगी? आता स्वतः पीलूने केला मोठा खुलासा

Ashish Vidyarthi Ex Wife Piloo On Divorce: आशिष यांच्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर पीलू यांना पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाल्याची चर्चा सध्या होत, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Ashish Vidyarthi Ex Wife Piloo On Divorce

बॉलिवूडचा खलनायक आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६० व्या वर्षी रुपाली बरुआसोबत दुसरं लग्न करत आपला संसार थाटलाय. त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर अभिनेते आशिष विद्यार्थी कमालीची चर्चेत आले आहेत. आशिष यांनी तब्बल २२ वर्ष संसार केल्यानंतर पहिली पत्नी राजोशी उर्फ पीलू विद्यार्थी यांच्यासोबत घटस्फोट घेतला होता. त्यांना एक मुलगा असून तो सध्या परदेशामध्ये शिक्षणाकरिता स्थायिक आहे.

आशिष यांची पहिली पत्नी सध्या सोशल मीडियावर ‘अकेली’मुळे चर्चेत आली आहे. नुकतंच त्यांनी प्रमोशन दरम्यान त्यांच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे. आशिष यांच्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर पीलू यांना पोटगी म्हणून मोठी रक्कम मिळाल्याची चर्चा सध्या होत, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood)

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, पीलू यांनी आशिष यांच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केलं आहे. पीलू विद्यार्थी म्हणाल्या की, “सोशल मीडियावर माझी एक जुनी मुलाखत प्रचंड व्हायरल झाली होती. माझ्या त्या व्हिडीओवर सोशल मीडियावर बराच वाद निर्माण झाला होता. काही लोक चांगल्या गोष्टी बोलत होते, पण अनेकजण या बातमीने निराश झाले होते. अनेकांनी मी पोटगी म्हणून मोठी रक्कम घेतल्याची चर्चा झाली होती. त्या चर्चा पाहून मला खूपच वाईट वाटलं. घटस्फोट घेणं इतकं सोपं नाही आणि त्याबद्दल मी आता कोणताही विचार करत नाही.” अशी प्रतिक्रिया राजोशी उर्फ पीलू विद्यार्थी यांनी दिली. (Bollywood Actress)

सोबतच त्यांना मुलाखतीत मुलाच्या बॉलिवूड डेब्यू संबंधित देखील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राजोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थला अभिनयामध्ये काहीच रस नाही. पण, त्याला म्युझिकमध्ये आवड आहे. अनेक गोष्टी तो आमच्याकडूनच शिकला आहे. आमच्या घरी गिटार आणि कीबोर्ड देखील आहे.” (Bollywood Film)

यापूर्वी सुद्धा पीलू विद्यार्थी यांनी त्यांच्या घटस्फोटावर भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी घटस्फोट घेण्यामागे कोणतेही कारण नाही, असे स्पष्ट केले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Hill Station: सोलापूरजवळ आहे 'हे' निसर्गरम्य हिल स्टेशन, परदेशी पर्यटकांसाठी स्वर्गसदृश सुंदर पर्यटनस्थळ

'ते म्हणजे दुतोंडी गांडूळ', शिंदेसेनेच्या खासदाराला संजय राऊतांनी डिवचलं

Bhayandar : तलावात पोहण्यासाठी उडी मारली तो वर आलाच नाही; भाईंदरच्या वरसावे तलावातील घटना

Supriya Sule: 'साधी राहणी अन् उच्च विचारसरणी' असणाऱ्या सुप्रिया सुळेंचे साडीतील फोटो पाहा

Beed Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपाला वेग, SIT चे पथक बीडमध्ये तळ ठोकून; भाऊ अन् वडिलांचा जबाब नोंदवला

SCROLL FOR NEXT