Pune International Film Festival Ashish shelar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pune Film Festival : मुंबईतील चित्रनगरीसाठी महाराष्ट्र सरकार देणार 10 एकर जागा; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

Pune International Film Festival : 23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

Shruti Vilas Kadam

Pune International Film Festival : चित्रपट महोत्सव हे चित्रपटांचा आणि कलाकरांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येतात. चित्रपट महोत्सवांच्या माध्यामातून कलाकारांचा सन्मान करण्यात येतो. असाच एक सन्मान सोहळा पुण्यात पार पडणार आहे. पुणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याच पुण्यात आज पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात झाली असून अनेक चित्रपटांचा आणि कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी पाच वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पीएफ डिस्टिंग्विश अवॉर्ड, तर ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस.डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी आपले मत व्यक्त करताना आशिष शेलार म्हणाले, अभिनयासाठी कुठल्याही अभिनेत्याला प्रचंड मेहनत करावी लागते. आपल्या जुन्या चित्रपटात ज्येष्ठ दिग्दर्शक राज कपूर यांच्या अभिनयातून कायम संवेदनशीलता दिसून आली आहे. आज येथे प्रारंभ झालेला पुणे फिल्म फेस्टिवल हा शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे. शासनाकडून फिल्म फेस्टिवल चांगल्या प्रकारचे अर्थसहाय्य होत असते. लवकरच, मुंबईतील चित्रनगरीत चित्रपटाशी संबंधित कामासाठी 10 एकर जागा देण्यात येण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.

13 ते 20 फेब्रुवारी या महोत्सव कालावधीत आयोजित या चित्रपट महोत्सवात विविध देशी-विदेशी सुमारे 150 चित्रपट, जागतिक स्पर्धा विभागातील 14 आणि मराठी स्पर्धा विभागातील 7 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT