Ashish Patil Sundari Show Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashish Patil: फसवणुक प्रकरणानंतर लावणीकिंग आशिष पाटीलची परदेशवारी; अमेरिकेत अवतरणार मुंबईची ‘सुंदरी’

Ashish Patil Sundari Show: कलेच्या माध्यमातून रसिकांच मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने 'सुंदरी’ या नव्या शो ची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती यशस्वी केली.

Shruti Vilas Kadam

Ashish Patil: लावणी म्हणजे ‘रसरंगांचं कारंजं! शब्दलावण्य, भावलावण्य यांचा मिलाप साधत घडणारा देखणा कलाविष्कार. या आविष्काराला वेगळं रूप देत आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न होणे हे कौतुकास्पदच. ‘लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील याने महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. कलेच्या माध्यमातून रसिकांच मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने 'सुंदरी’ अदा ताल शृंगार या नव्या शो ची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती यशस्वी केली.

मुंबईत 'सुंदरी’ अदा ताल शृंगार शो ला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता 'सुंदरी’ या शोचा नजराणा जुलै महिन्यात अमेरिकेत रंगणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर आणि आशिष पाटील या दोघांच्या अदाकारीने ही नृत्य मैफिल सजणार आहे.

लोकप्रिय संगीतातून आणि तितक्याच लयबद्ध नृत्याविष्कारातून, त्यातील भावभावनांचे लोभसवाणे सादरीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा आशिष पाटीलचा प्रयत्न आहे. 'सुंदरी’ अदा ताल शृंगार हा अविस्मरणीय कार्यक्रम मनाचा ठाव घेतो, अशा शब्दांत रसिकांनी आणि मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे.

परंतु, लावणीकिंग आशिष पाटीलवर काही दिवसांपूर्वी प्रवीण कलमे यांनी ‘सुंदरी’ या नावाचा ट्रेडमार्क आणि संकल्पना आशिषने चोरून स्वतःच्या नावावर बनवून नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केल्याचा आरोप करत त्याच्यावर केस दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दहावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी 11 कॉपी बहाद्दरांवर कारवाई

Tulsi Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी प्या तुळशीचे पाणी, वजन होईल झटक्यात कमी

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारी संपत आला तरी जानेवारीचा हप्ता नाही, ₹१५०० न येण्यामागचं कारण काय? वाचा

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून त्यांना गोव्याल हलवले; शिंदेंच्या नेत्याचा टोला

Exercise For Weight Loss: चालणं, जॉगिंग की सायकलिंग? कोणत्या व्यायामाने लवकर वजन होईल कमी?

SCROLL FOR NEXT