Zanai Bhosle - Siraj  Instagram
मनोरंजन बातम्या

Zanai Bhosle - Siraj: DSP सिराजसोबत अफेअरच्या चर्चा, जनाई भोसलेनं एक पोस्ट केली अन् विषय संपवला

Zanai Bhosle - Siraj Dating: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराज एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगत होत्या.

Shruti Kadam

Zanai Bhosle - Siraj: दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले आणि क्रिकेटर मोहम्मद सिराज यांचा एक फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावायला सुरुवात केली की ते दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. फोटोमध्ये जनाई आणि सिराज एकमेकांना प्रेमाने पाहताना दिसत होते. जनाई आणि सिराजच्या डेटिंगची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, आता दोघांनीही यावर प्रतिक्रिया देत या फोटो मागील सत्य सांगितले आहे.

जनाई भोसले आणि मोहम्मद सिराज एकमेकांना डेट करत नाहीत

खरंतर, क्रिकेटपटू मोहम्मद सिराज जनाई भोसलेच्या २३ व्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. पार्टीचा एक फोटो समोर आला, यामध्ये जनाई आणि सिराज यांना एकत्र पाहून चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. आता जनाईने यावर प्रतिक्रिया दिली. जनाई म्हणाली की त्यांच्यात भावा-बहिणीचे नाते आहे. तिने सिराजसोबतचा तोच फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आणि लिहिले, 'माझा प्रिय भाऊ'.

त्यानंतर सिराजने जनाईची इंस्टाग्राम स्टोरी पुन्हा शेअर केली आणि लिहिले, "माझ्या बहिणीसारखी दुसरी बहीण नाही. मी तिच्याशिवाय कुठेही राहू शकत नाही. ज्याप्रमाणे तारे आणि चंद्र आहेत, तशी माझी बहीण हजारोंमध्ये एक आहे." त्यांच्या या स्टोरीमुळे या दोघांमधील डेटिंग अफवांना पूर्णविराम लागला आहे.

कोण आहे जनाई भोसले?

आशा भोसले यांची नात जनाई भोसले ही एक गायिका आणि नृत्यांगना आहे. ती 'द प्राइड ऑफ इंडिया - छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामध्ये ती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सईबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, जनाईचे 'कहंदी है' हे गाणे २७ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. अनेकांना माहित असेल की जनाई ही बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची चुलत बहीण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT