Asha Bhosle concert Google
मनोरंजन बातम्या

Asha Bhosle : आशा भोसलेंचा ९१ व्या वर्षी 'तौबा तौबा' गाण्यावर भन्नाट डान्स; चाहते म्हणाले, 'एक अविस्मरणीय क्षण...'

Asha Bhosle Performs : आशा भोसलेंनी त्यांच्या लाईव्ह शोमध्ये 'तौबा तौबा' या विक्की कौशलच्या गाण्यांवर हुक स्टेप करुन चाहत्यांना थक्क केले आहे. त्यांच्या या डान्सवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Asha Bhosle : वयाच्या 91 व्या वर्षीही आशा भोसले यांनी त्यांच्या दमदार परफॉर्मन्समुळे सर्वांना नाचायला भाग पाडले. दुबईत आयोजित संगीत कार्यक्रमात आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' हे सुपरहिट गाणे गाऊन या गाण्याची हुक स्टेप सादर करून दाखवली. त्याच्या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, त्या एका हातात माईक घेऊन काळ्या बॉर्डरसह पांढऱ्या रंगाच्या साडीत स्टेजवर उभ्या आहेत. गायक करण औजलाचे गाणे गायल्यानंतर आशा भोसले यांनीही या गाण्याची हुक स्टेप केली.

'तौबा तौबा' हे गाणे करण औजलाने संगीतबद्ध केले आहे. यासोबतच त्यांनी या गाण्याला आवाजही दिला आहे. 'तौबा तौबा' हे विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या 'बॅड न्यूज' चित्रपटामधील गाणे आहे. करण औजलाने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचे म्हटले आहे. गायकाने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, 'संगीताची देवी आशा भोसले जी यांनी 'तौबा तौबा' गायले. एका छोट्या गावात वाढणाऱ्या मुलाने रचलेले गाणे. विशेष म्हणजे ज्या मुलाला संगीताची पार्श्वभूमी नाही.

तो पुढे म्हणाला, 'या गाण्याला केवळ चाहत्यांकडूनच नव्हे तर संगीत कलाकारांचेही खूप प्रेम मिळाले आहे, पण हा क्षण खरोखरच अविस्मरणीय आहे आणि तो मी कधीही विसरणार नाही. मी खरोखर धन्य आणि कृतज्ञ आहे. तुम्हाला असे सर्व ट्रॅक देत राहण्यासाठी आणि खूप आठवणी निर्माण करण्यासाठी हे मला खरोखर खूप प्रेरित झालो आहे.

करणने पुढे लिहिले. ‘मी तौबा तौबा गाणे वयाच्या २७ व्या वर्षी लिहिले आणि आशाजी यांनी वयाच्या ९१व्या वर्षी माझ्यापेक्षा चांगले गायले. आशा भोसले आणि सोनू निगम यांनी रविवारी दुबईमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी एकत्र आले. सोनू निगम आणि आशा भोसले यांचा दुबईतील कोका-कोला एरिना येथे कॉन्सर्ट आयोजित करण्यात केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

Train Accident : अंगावर काटा आणणारा रेल्वे अपघात! पेसेंजर ट्रेन थेट मालगाडीवर चढली, लोको पायलटसह ११ प्रवाशांचा मृत्यू

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT