Aryan Khan Web Series Shooting Started Shah Rukh Khan Reached On Firts Day Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Visits Aryan Khan’s Web Series Set: आर्यनच्या शूटिंगला शाहरूखची हजेरी, किंग खानने लेकाला दिले खास सरप्राईज...

Chetan Bodke

Shah Rukh Visits Sets on First Day of Shoot: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान सध्या आगामी चित्रपटांमुळे कमालीचा चर्चेत आहे. नुकतंच शाहरूखने लेक आर्यनच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर हजेरी लावली होती. शाहरूख आपल्या लेकामुळे कमालीचा चर्चेत आला होता. अडचणीत सापडलेला आर्यन कशाप्रकारे आपल्या करियरची सुरूवात करतो असा सर्वांनाच विचार पडला होता. आपल्या वडिलांचा तो वारसा पुढे नेणार का? शाहरूख मुलाच्या जीवनाला नवी संजीवनी देणार का? असा सगळ्यांनाच सवाल पडला होता. निर्माती गौरी खान आणि अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आता करियरची सुरूवात अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून करणार आहे. त्याने आगामी प्रोजेक्टच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण केले असून लवकरच वेब सीरिजच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.

आर्यनच्या ‘स्टारडम’ या वेब सीरिजची शूटिंग २ जून २०२३ पासून सुरू झाली असून त्याच्या आगामी प्रोजक्टची वाट सर्वच पाहत आहेत. आर्यनचा हा पहिला प्रोजेक्ट असून लाडक्या लेकाचे काम पाहण्यासाठी आणि मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी खास शाहरूख शूटिंग सेटवर पोहोचला होता. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खान सेटवर पोहोचला होता, त्यावेळी शूटिंग स्पॉटवर आर्यन खान दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसला.

‘स्टारडम’च्या शूटिंगला मुंबईत शुक्रवारपासून सुरुवात झाली. या खास प्रसंगी शाहरुख खान सकाळी लवकर उठून मुलगा आर्यनला सेटवर खास सरप्राईज देण्यासाठी सकाळी लवकर पोहोचला होता. शाहरूखने सकाळी ७ वाजता सेटवर पोहोचून टीमची आणि आर्यनचीही भेट घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.

आर्यन खानच्या वेबसीरिजची निर्मिती रेड चिलिज एन्टरटेन्मेंट करत आहे. ही सहा भागांची सीरीज असून वेबसीरिजची कथा ‘स्टारडम’ आणि स्वतः फिल्म इंडस्ट्रीभोवती फिरते.

शाहरुख खान आणि रणवीर सिंग देखील ‘स्टारडम’चा भाग असण्याची शक्यता आहे, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. पीपिंग मूनच्या रिपोर्टनुसार, 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आणि 'कुबूल है' सारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या गौतमी कपूर (राम कपूरची पत्नी) सोबत, शाहरुख खान आणि रणवीर सिंह दिसू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT