Aryan Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: 'पडद्या मागचा हिरो' आर्यनच्या घोषणेनंतर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींकडून होतोय कौतुकांचा वर्षाव

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या परिवारासाठी आंनदाची बातमी आहे. शाहरूखचा मुलगा आर्यनने येत्या काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे.

Chetan Bodke

Aryan Khan: बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या परिवारासाठी आंनदाची बातमी आहे. शाहरूखचा मुलगा आर्यनने येत्या काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे जाहीर केले आहे. नुकतचं आर्यनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आर्यन लवकरच अभिनेत्याच्या भूमिकेत नाही तर लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. आर्यनच्या या पोस्टवर चाहत्यांसह बॉलिवूडच्या अनेक दिग्गज मंडळीनी त्याचे अभिनंदन केले आहे.

आर्यनने शेअर केलेल्या पोस्टवर "रेड चिलीज एंटरटेनमेंट"असं लिहिलेलं आहे. त्याने कॅप्शनमध्ये 'लेखन पूर्ण झाले आहे. आता शूटिंगसाठी प्रतीक्षा करू शकत नाही.' असे म्हटले आहे. त्याने त्यासोबत कॅमेरा इमोटिकॉन देखील शेअर केला आहे.

आर्यनने शेअर केलेल्या पोस्टवर वडील शाहरुखची कमेंट लक्ष वेधत आहे. शाहरुखने लिहिलं आहे,"वाह..विचार केला..विश्वास ठेवला आणि आता अखेर स्वप्न साध्य होणार आहे. पहिला प्रोजेक्ट नेहमीच खास असतो. तुला पहिल्या सिनेमासाठी खूप शुभेच्छा". तर गौरी खानने 'आता सिनेमाची प्रतीक्षा' अशी कमेंट केली आहे.

यासह अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावरील आर्यनच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. आलिया भट्ट आणि कतरिना कैफ, शनाया कपूर, सिकंदर खेर आणि मनीष मल्होत्रा सेलिब्रिटींनी आर्यनला शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्यन खानच्या पोस्टवर, त्याची मैत्रिण शनाया कपूरने कमेंट केली तिने "Woooo"असं म्हटलं आहे. त्याचवेळी अभिनेता संजय कपूरनेही सर्वोत्कृष्ट लिहून कौतुक केले आहे. तर तारा शर्मा, मनीष मल्होत्रा ​​करिश्मा शर्मा आणि आलिया भट्ट, कतरिना कैफ यांनी जोरदार कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्टार्ससोबतच चाहतेही आर्यनसाठी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. आर्यनच्या पोस्टवर दिवसभरात सुमारे २५० लाख प्रतिक्रिया आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; अशक्यही शक्य होईल! वाचा आजचे राशीभविष्य

महाराष्ट्रात पुन्हा कंत्राटदाराची आत्महत्या; वर्षभरात 3 कंत्राटदारांनी संपवलं जीवन

नायब तहसीलदाराची गुंडगिरी? नायब तहसीलदारांनं धरली शेतकऱ्याची कॉलर

Adani-Ambani Face-Off: मराठी सण गुजराती ब्रँडिंग; गणेशोत्सवात अदानी-अंबानी वॉर

कंगना-क्रितीच्या वादात राहुल गांधींची उडी; क्रिती सॅननच्या जाहिरातीनं राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT