Nitin Chandrakant Desai's Funeral Saam TV
मनोरंजन बातम्या

Nitin Desai's Funeral : नितीन देसाईंवर एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार

Nitin Desai : एनडी स्टुडिओतील जोधा अकबरच्या सेटवर त्यांच्या अंतिम संस्कार पार पडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nitin Desai's Funeral At ND Studio : बॉलिवूडमधील कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. नितीन देसाई यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. एनडी स्टुडिओतील जोधा अकबरच्या सेटवर त्यांच्या अंतिम संस्कार पार पडले आहे.

नितीन देसाई यांचा मुलगा, मुलगी आणि जावई परदेशात होते. ते आज परदेशातून मुंबईत आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव जेजे हॉस्पिटलमधून ताब्यात घेण्यात आले.

जेजे हॉस्पिटलमध्ये नितीन देसाईंना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पार्थिव कर्जत येथील त्यांच्या एनडी स्टुडिओत आणण्यात आले. तिथे त्यांचे पार्थिव काहीकाळ सर्वासाठी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

अनेक दिग्गजांनी कर्जतला जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले होते. यात विनोद तावडे, जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे छत्रपतीसह अनेक नेते आणि अभिनेते उपस्थित होते. तसेच त्याचे सहकारी आणि विद्यार्थी देखील नितीन देसाई यांच्या अंतिम दर्शनासाठी हजर होते. (Celebrity)

नितीन चंद्रकांत देसाई कर्जतच्या एन.डी स्टुडिओमध्ये (N D Studio) त्यांनी गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे.

नितीन देसाई यांनी त्यांच्याच मालकिच्या एन. डी स्टुडिओमध्ये गळफास लावून त्यांचे जीवन संपवले होते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT