Payal Malik Evicted Bigg Boss 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Payal Malik Evicted : ...म्हणून पायल मलिक पडली बिग बॉसच्या घराबाहेर, स्वत:च VIDEO शेअर करत सांगितले कारण

Bigg Boss OTT 3 Latest Update : प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक घराबाहेर पडली आहे. तिला प्रेक्षकांकडून सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर पडावं लागलं आहे.

Chetan Bodke

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन सध्या चांगलाच गाजतोय. नुकतंच दुसरा एलिमिनेशन राऊंड पार पडला. यामध्ये, प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक घराबाहेर पडली आहे. तिला प्रेक्षकांकडून सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर पडावं लागलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात अरमान मलिकसोबत त्याची पहिली पत्नी पायल मलिक आणि दुसरी पत्नी कृतिका मलिक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर पायल मलिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. ज्यामध्ये, तिने आपल्या एलिमिनेशन राऊंडवर भाष्य केले आहे. ‘जनतेनं आपला निर्णय जाहीर केला आहे. पायल मलिकला घराबाहेर जावं लागेल’, अशी तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पायल म्हणते, "मला कमी वोट्स मिळाल्यामुळे घराबाहेर आलेली नाही, ही गोष्ट मला माहीत आहे. घराबाहेर येण्याचं मुख्य कारण म्हणजे, घरातले अनेक स्पर्धक आहेत."

व्हिडिओमध्ये पायल म्हणाली, "माझ्या काही प्रतिस्पर्ध्यांनी मला नॉमिनेट केल्यामुळे घराबाहेर पडली आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने खेळत होते. माझा स्वभाव जसा आहे, तसा प्रेक्षकांना दिसत होता. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचे आभार मानते. " पायलने इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांनाही काही प्रश्न विचारले आहेत.

तुम्हाला काय वाटतं, माझ्यासोबत चुकीचं घडलं की बरोबर ? या प्रश्नावर अनेक युजर्सने घडलेलं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी जे घडलंय ते बरोबर आहे. अशी प्रतिक्रिया दिली. पायल मलिक घरातून बाहेर गेल्यानंतर या आठवड्यासाठी घरातल्या सदस्यांनी विशाल पांडे, शिवानी कुमारी, चंद्रिका दीक्षित, मुनिषा, पौलोमी दास आणि नॅजीला घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

BJP vs TMC Clash : निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हत्यासत्र, भाजप नेत्यासह आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

Accident News: मोठी बातमी! 'प्रभास'च्या क्रू मेंबर्सच्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर

Pune : पोलीस दलात खळबळ! १.५ लाखांची लाच घेताना हवालदाराला रंगेहाथ पकडलं; कारवाईदरम्यान तक्रारदाराच्या छातीचा घेतला चावा

Health care: जेवणानंतर फळे खाणं योग्य आहे का? कोणती फळे ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT