Famous Actor Brother Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Brother Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; भावानं विषारी कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवलं

Famous Actor Brother Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या भावाने कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवले आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाचे निधन झाले आहे.

अभिनेत्याच्या भावाने कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवले.

भावाच्या निधनानंतर अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे.

मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावाचे निधन झाले आहे. कीटकनाशक पिऊन अभिनेत्याच्या भावाने आयुष्य संपवलं आहे. साऊथ प्रसिद्ध अभिनेता राहुल रामकृष्ण याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राहुलच्या भावने विषारी कीटकनाशक पिऊन आपले आयुष्य संपवलं. भावाच्या निधनाने अभिनेता खचला असून त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

राहुल रामकृष्ण यांची पोस्ट

"माननीय महोदय,

आज पॅराक्वेट (Paraquat) विषबाधेमुळे मी माझ्या भावाला गमावले. हे रसायन अत्यंत जीवघेणे आहे आणि आत्महत्येसाठी याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे. हे रसायन सर्वत्र इतक्या सहजपणे उपलब्ध आहे, हे पाहून मला मोठा धक्का बसला आहे. या विषबाधेच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून डॉक्टरही हतबल झाले आहेत. कृपया, लवकरात लवकर यावर बंदी घाला आणि लोकांचे प्राण वाचवा." राहुल रामकृष्ण याने या पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'पॅराक्वाट'वर तातडीनं बंदी घालण्याची मागणी केली आहे.

विषारी कीटकनाशक शेतीमध्ये तणनाशक म्हणून वापरले जाते, मात्र माणसांसाठी ते जीवघेणे आहे. या पोस्टनंतर नेटकरी आणि कलाकार मंडळी अभिनेता राहुल रामकृष्ण याला धीर देताना दिसत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी राहुल रामकृष्णच्या भावावर श्रद्धांजली वाहिली.

राहुल रामकृष्ण हा साऊथचा प्रसिद्ध अभिनेता आहे. 'अर्जुन रेड्डी' चित्रपटामुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्याने 'आरआरआर' चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. राहुल कायम सामाजिक विषयांवरही आपली स्पष्ट मते मांडताना दिसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT