Bollywood Actor Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Actor Wedding : ४ मुलांचा बाप दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, बॉलिवूडच्या स्टार अभिनेत्याने ५३ व्या वर्षी गर्लफ्रेंडसोबत बांधली गुपचूप लग्नगाठ

Arjun Rampal Wedding : बॉलिवूड अभिनेत्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. ७-८ वर्षांच्या डेटिंगनंतर आणि दोन मुलांनंतर अभिनेत्याने गर्लफ्रेंडसोबत लग्न केले आहे.

Shreya Maskar

धुरंधर स्टार अभिनेत्याने गुपचूप बांधली लग्नगाठ

५३ व्या वर्षी बॉलिवूडचा स्टार अभिनेता चढला बोहल्यावर

गोव्यात पार पडला विवाह सोहळा

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. धुरंधर स्टार अभिनेत्याने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने (Arjun Rampal) शुक्रवारी गोव्यामध्ये गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) सोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नाची अधिकृत नोंदणी केली. चाहते या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्या लग्नाची नोंदणी गोवा राज्याच्या 'समान नागरी कायद्या' (Uniform Civil Code) अंतर्गत करण्यात आली, अशी माहिती उप-निबंधक सूरज वर्णेकर यांनी दिली. उत्तर गोव्यातील मापुसा येथील उप-निबंधक कार्यालयात जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत या अभिनेत्याने लग्नाशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

मूळची दक्षिण आफ्रिकेची नागरिक असलेली डेमेट्रिएड्स सध्या पणजीजवळील सुकोरो गावात रामपालसोबत राहते. कॅज्युअल कपड्यांमध्ये हे जोडपे दुपारी ४ च्या सुमारास कार्यालयात पोहोचले. स्थानिक कायद्यानुसार लग्नाच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्वाक्षरीदरम्यान आवश्यक असलेला १५ दिवसांचा कालावधी शिथिल करण्यासाठी त्यांनी स्थानिक न्यायालयाच्या सहाय्यक सरकारी वकिलांकडून विशेष परवानगी घेतली होती. अद्याप अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

अर्जुन रामपाल-गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांचे नाते

अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्स २०१८ पासून एकत्र आहेत आणि त्यांना दोन मुले आहेत. अरिक (जन्म २०१९) आणि अराव (जन्म २०२३). दक्षिण आफ्रिकन मॉडेल आणि फॅशन डिझायनर असलेल्या डेमेट्रिएड्स अनेकदा आपल्या मुलांसोबत एकत्र दिसते. जवळपास ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघे लग्नबंधनात अडकले.

अर्जुन रामपालचं दुसरे लग्न

अर्जुन रामपालचे हे दुसरे लग्न आहे. गॅब्रिएला डेमेट्रिएड्सपूर्वी अर्जुन रामपालने माजी सुपरमॉडेल आणि उद्योजिका मेहर जेसिया यांच्याशी लग्न केले होते. या जोडप्याने १९९८ मध्ये लग्न केले असून २०१९ ला यांचा घटस्फोट झाला. त्यांना माहिका आणि मायरा अशा दोन मुली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; राहुरी तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

Ulhasnagar Politics : भाजप-शिंदेसेनेत पुन्हा संघर्ष; उल्हासनगरच्या राजकारणाला कलाटणी?

Leg Cramps at Night: रात्री झोपेत अचानक पायात क्रॅम्प्स येतात? 'या' ६ कारणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

भाजपचा दणदणीत विजय; तब्बल 23 वर्षांनंतर काँग्रेसला बालेकिल्ल्यात मोठा धक्का

Stamp Duty: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! जमीन नोंदणीमध्ये स्टॅम्प ड्युटी कशी ठरवली जाईल? थेट नियमच सांगितला

SCROLL FOR NEXT